Last Updated on 31 Dec 2025 7:08 PM by Sanjay Patil/Adhorekhit
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचा आ. जयंतराव पाटील यांच्या उपस्थितीत निर्णय
सांगली ।
उरुण ईश्वपूरच्या माजी नगराध्यक्ष प्रा.अरुणदेवी पाटील यांची राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने उरुण ईश्वरपूर नगरपालिकेतील नगरसेवकांच्या गटनेते पदी एकमताने निवड करण्यात आली आहे. माजी मंत्री आ.जयंतराव पाटील, लोकनियुक्त नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे, तसेच कार्यकारी समितीचे सदस्य व प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये ही निवड करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष शहाजी पाटील यांच्या हस्ते प्रा. अरुणादेवी पाटील यांचा सत्कार करण्यात आला.
आ. जयंतराव पाटील यांनी नूतन गटनेत्या प्रा.अरुणादेवी पाटील यांना शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले,अरुणाकाकी पाटील या जेष्ठ आणि अनुभवी आहेत. त्यांनी दोन वेळा या शहराचे नगराध्यक्ष पद भूषविताना या शहराचा राज्यातील एक नंबरचे शहर असा नांवलौकिक केला आहे. हे शहर पुन्हा दुरुस्त करताना त्यांच्या अनुभवाचा निश्चित फायदा होईल. त्या सर्व नगरसेवकांना समवेत घेऊन नगरपालिकेतील कामाला आणि शहराच्या विकासाला गती देण्यात योगदान करतील.
प्रा.अरुणादेवी पाटील म्हणाल्या, आ. जयंतराव पाटील व पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी माझ्यावर जो विश्वास टाकला आहे,तो सार्थ करण्याचा प्रयत्न करेन.
याप्रसंगी प्रा.शामराव पाटील, जेष्ठ नेते बी.ए. पाटील, माजी नगराध्यक्ष पै.भगवान पाटील, माजी सभापती व नगरसेवक खंडेराव जाधव, माजी नगराध्यक्ष मुनीर पटवेकर, नगरसेवक सुभाषराव सूर्यवंशी, उद्योजक सुरेंद्र पाटील, माजी उप नगराध्यक्ष दादासाहेब पाटील, महिला शहराध्यक्षा व नगरसेविका पुष्पलता खरात, माजी अध्यक्षा रोझा किणीकर, माजी उपनगराध्यक्ष शंकरराव चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य सरचिटणीस अरुण कांबळे प्रामुख्याने उपस्थित होते.












































































