Last Updated on 29 Jul 2024 9:32 AM by Sanjay Patil/Adhorekhit
मोबाईल झाले मुलांचे खेळणे..!
मैदानावर मुलं कमी…मोबाईल समोरचं जास्त
सांगली । विनोद मोहिते
घरी पालकांसोबत लुडबुड करणारी लहान मुले आता मोबाईल मध्ये रमतात दिसत आहेत.शाळेचा अभ्यास करताना पाटी-पेन्सिलबरोबर आता मोबाईल मुलांचा साथीदार बनला आहे.अभ्यास कमी आणि खेळ अधिक सुरू आहे.
काही वर्षापूर्वी झाडाखाली,अंगणात मुलं गोट्या,विटीदांडू,चेंडू खेळताना दिसायची.आता मात्र लहान मुलांच्या हातात सर्रास मोबाईल फोनची खेळणी दिली जात आहेत.विशेष म्हणजे,मुलेही या नव्या युगाच्या खेळीत आनंदी दिसत आहेत.मुलांच्या हातात मोबाइलचं खेळणं झाले असले तरी याचा मुलांच्या डोळ्यांवर,आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे.
अभ्यास करताना मोबाईल गरजेचा आहे.यामुळे पालक आपल्या लहान मुलांना मोबाईल देत आहेत.लहान मुले अभ्यासाला बसलेली असतात तेव्हा मात्र अभ्यास कमी आणि अन्य गोष्टींसाठी मोबाइल फोनमध्ये मग्न असल्याची दिसत आहेत.
मोबाइलवर गाणे ऐकणे,गेम खेळणे,फोटो पाहणे,एकमेकांचे फोटो काढणे असे खेळ खेळले जात आहेत.पूर्वी हिच शालेय मुले रिंगण करून खेळत असत.चेंडू,गोट्या,विटीदांडूचे डाव रंगत तर लहान मुले सारी गंमत पाहात किंवा खेळात सहभागी होत असत.आता मात्र सर्वच जण खेळ बाजूला ठेऊन मोबाइल फोनमध्ये रमत असल्याचे चित्र आहे.अलीकडे सर्वच बाबी डिजिटल झालेल्या आहेत.त्यामुळे मोबाइलचा वापर अनिवार्य ठरतो.
![]()
अनेक पालकांना मोबाइलचे काही कळत नसले तरी वयाने लहान असणारी पाल्य मात्र,मोबाईलमध्ये सर्व व्यवहार करत असताना दिसून येत आहेत. याबद्दल पालकांना अधिक कौतुक असते. सध्या मोबाइलचा वापर सकारात्मक दिसून येत असला तरी त्याचा वापर कोठे व कसा केला जात आहे यावर नियंत्रण असणे आवश्यक आहे.त्यात नेहमी मोबाईल मध्ये गुंतून राहत असल्याने लहान मुलांचे मानसिक आरोग्य बिघडले आहे. अशा मुलांना समवयस्क गटात खेळणे गरजेचे आहे.काही मुलं मोबाईलच्या आहारी गेले आहेत. त्यांच्याशी पालकांनी संवाद वाढवायला हवा.
सौ.वर्षाराणी मोहिते
संचालिका,मुक्तांगण प्ले स्कूल इस्लामपूर
![]()











































































