ऑफलाईन पद्धतीने होणार परीक्षा
नवी दिल्ली ।
केंद्रीय शिक्षा बोर्डाने इयत्ता 10वी आणि 12वीच्या टर्म-2 परीक्षेची तारीख जाहीर केली आहे. ही परीक्षा 26 एप्रिलपासून सुरू होणार आहे. त्याचबरोबर विषयनिहाय तारीखपत्रकही लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. परीक्षेचा नमुना पेपरमध्ये दिल्याप्रमाणेच असेल.
कोरोना संकटामुळे मागच्या वेळेप्रमाणे बोर्ड परीक्षा रद्द होऊ नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. आता दुसऱ्या टर्मची डेटाशीट लवकरच जारी करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांसना परीक्षेच्या तयारीसाठी भरपूर वेळ मिळणार आहे. दरम्यान 5 जुलै 2021 ला कोरोनामुळे बोर्डाने परीक्षा दोन टर्ममध्ये घेण्याची घोषणा केली होती.
डेटाशीट लवकरच बोर्डाच्या अधिकृत वेबसाईट cbse.nic.in जारी करण्यात येणार आहे.
पहिली टर्मची परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांचे निकाल अद्याप जाहीर झालेले नाहीत.