मुंबई ।
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षा ऑफलाईनच होणार असल्याचे स्पष्ट केले आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळेतच परीक्षा देता येणार आहे.मुख्याध्यापक,विषयतज्ञ यांच्याशी चर्चा करून निश्चित करण्यात आले आहेत. हावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीनेच होणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.
यंदा परीक्षेसाठी अर्धा तास अधिक वेळ दिल्यामुळे परीक्षा ११ ऐवजी १० वाजून ३० मिनिटांनी सुरू होईल. त्याआधी दहा मिनिटे म्हणजे १०.२० वाजता विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका देण्यात येईल. बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दहावी, बारावी परीक्षांसंबंधीची सर्व माहिती आणि यंदाच्या परीक्षेसंदर्भातील महत्त्वाच्या सूचना या पत्रकार परिषदेत दिल्या.
ज्या विद्यार्थ्यांना काही कारणास्तव परीक्षा देता येणार नाही त्यांना ३१ मार्च ते १८ एप्रिल या कालावधीत पुन्हा परीक्षा देता येईल. यंदा दहावीची परीक्षा १५ मार्च २०२२ पासून सुरू होणार आहे आणि ४ एप्रिलपर्यंत सुरू राहणार आहे. ४० ते ६० गुणांच्या पेपरसाठी अतिरिक्त १५ मिनिटे आणि ७० ते १०० गुणांच्या पेपरसाठी अतिरिक्त ३० मिनिटांचा वेळ देण्यात येणार आहे. यंदा आतापर्यंत परीक्षेसाठी बारावीच्या १४ लाख ७२ हजार ५६२ विद्यार्थ्यांची नोंदणी तर दहावीच्या १६ लाख २५ हजार ३११ विद्यार्थ्यांची नोंदणी झाली आहे.
परीक्षांच्या तारखा
दहावी
दहावीची लेखी परीक्षा – १५ मार्च २०२२ ते ४ एप्रिल २०२२
दहावीची प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी परीक्षा, अंतर्गत मूल्यमापन – २५ फेब्रुवारी २०२२ ते १४ मार्च २०२२
बारावी
बारावीची लेखी परीक्षा – ४ मार्च २०२२ ते ३० एप्रिल २०२२
बारावीची प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी परीक्षा, अंतर्गत मूल्यमापन – १४ फेब्रुवारी २०२२ ते ३ मार्च २०२२
विषय,माध्यम व प्रश्नपत्रिका संख्या
मंडळाची परीक्षा सार्वत्रिक स्वरुपाची असून संपूर्ण राज्यात एकाच वेळी एकसमान प्रश्नपत्रिकेवर आयोजित केली जाते. यामध्ये वस्तुनिष्ठ, लघुत्तरी व दिर्घोत्तरी प्रश्नांचा समावेश असतो. बारावीसाठी 356 तर दहावीसाठी 158 प्रश्नपत्रिका असतील.
काही महत्त्वाचे मुद्दे
- दहावीची परीक्षा 15 मार्च ते 4 एप्रिल दरम्यान होणार आहे.
- दिलेल्या वेळापत्रकात काही कारणास्तव जर मुलांना प्रॅक्टीकल परीक्षा देता आल्या नाहीत, तर त्यासाठी त्यांना 31 मार्च ते 18 एप्रिल या वेळेत परीक्षा देण्याची संधी देण्यात आली आहे.
- विद्यार्थ्यांना 10 मिनिटे आधी प्रश्नपत्रिका दिली जाणार
- 40-60 गुणांच्या परीक्षेसाठी 15 मिनिटे वाढवून दिली गेली आहेत.
- तसेच 70 ते 100 गुणांच्या पेपरसाठी 30 मिनिटे वेळ वाढवून देण्यात आली आहे.
- एका वर्गात 26 विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी बसवले जाणार आहे. कोरोना नियमांचे पालन करत या परीक्षा घेतल्या जाणार आहेत.
- तसेच तब्येतीच्या कारणास्तव विद्यार्थ्यांना त्रास झाल्यास त्यांना वेगळ्या कक्षात बसवले जाणार आहे. तसेच त्यांच्या आरोग्याची योग्य ती काळजी घेतली जाणार आहे.
- विद्यार्थ्यांना चांगले वातावरण मिळावं म्हणून त्यांच्याच शाळा वा महाविद्यालयांमध्ये परीक्षा केंद्र देण्यात आली आहेत.
- ज्या शाळा वा महाविद्यालयांमध्ये 15 पेक्षा कमी विद्यार्थी परीक्षा देणार असतील तेथील मुलांना जवळचे परीक्षा केंद्र देण्यात येणार आहे.
- तसेच परीक्षेच्या वर्गात परीक्षक म्हणून त्याच शाळा वा महाविद्यालयातील शिक्षकांची नियुक्ती करण्यात येणार आहे.