Last Updated on 27 Jan 2022 10:15 AM by Sanjay Patil/Adhorekhit
लेग स्पिनर रवी बिष्णोई याची पहिल्यांदाच टीम इंडियामध्ये निवड
कुलदीप यादवचं वनडे टीममध्ये पुनरागमन
रवी बिष्णोईशिवाय आवेश खान आणि दीपक हुड्डा हे नवीन चेहरे
दक्षिण आफ्रिकेत टेस्ट आणि वनडे खेळलेल्या बुमराहला विश्रांती
वॉशिंग्टन सुंदरची वनडे आणि टी-20 टीममध्ये निवड तर आर.अश्विनला विश्रांती
मुंबई ।
वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे आणि टी-20 सीरिजसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे.रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडिया मैदानात उतरत आहे.दक्षिण आफ्रिकामध्ये आपल्या लौकिकास साजेशी कामगिरी न करु शकणाऱ्या अश्विनला वगळण्यात आले आहे. युवा फिरकीपटू रवि बिश्नोई याला टी20 आणि एकदिवसीय संघात स्थान देण्यात आले आहे.तर अष्टपैलू दीपक हुड्डा याला एकदिवसीय संघात स्थान देण्यात आले आहे.
रोहित शर्माचे होणार पुनरागमन
भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा हा दुखापतीमुळे दक्षिण आफ्रिका दौऱ्यावरून बाहेर झाला होता.परंतु,तो आता पूर्णपणे फिट असून वेस्ट इंडिज विरुद्ध होणाऱ्या वनडे मालिकेतील तो पुनरागमन करणार आहे.विराट कोहलीला वनडे संघाच्या कर्णधार पदावरून काढल्यानंतर कर्णधार म्हणून ही त्याची पहिलीच वनडे मालिका असणार आहे.
कुलदीपचे पुनरागमन
चायनामॅन फिरकी गोलंदाज कुलदीप यादव याचे एकदिवसीय संघात पुनरागमन झाले आहे बऱ्याच दिवसानंतर कुलदीपचे भारतीय संघात पुनरागमन झाले आहे.त्यामुळे 2019 नंतर आता पुन्हा एकदा कुलदीप-चहल म्हणजेच कुलच्याची जोडी मैदानावर दिसणार आहे.
दोन्ही मालिकेसाठी भारतीय संघाचा कर्णधार म्हणून रोहित शर्माची निवड करण्यात आली आहे.तर के. एल. राहुल उपकर्णधार असणार आहे.तसेच विराट कोहलीचा या संघात समावेश आहे.जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमीला विश्रांती देण्यात आली आहे.हार्दिक पांड्या आणि रवींद्र जडेजा अजूनही फिट न झाल्यामुळे त्यांची टीम इंडियात निवड झाली नाही. तर दक्षिण आफ्रिकेत सगळ्या टेस्ट आणि वनडे खेळलेल्या बुमराहला विश्रांती देण्यात आली आहे. पहिल्या वनडे मध्ये राहुल खळणार नाही, पण दुसऱ्या आणि तिसऱ्या सामान्यात तो खेळणार आहे. 21 वर्षीय रवि बिश्नोई पहिल्यांदाच भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करत आहे. स्थानिक पातळीवर आणि आयपीएलमध्ये रवी बिश्नोईने दमदार कामगिरी केली आहे.
कोरोना व्हायरसमुळे वनडे सीरिज अहमदाबादमध्ये तर टी-20 सीरिज कोलकात्यामध्ये होणार आहे.
भारताची वन-डे टीम : रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, शिखर धवन, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, दीपक हुडा, ऋषभ पंत (विकेटकीपर), दीपक चहर, शार्दुल ठाकूर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिष्णोई, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा आणि आवेश खान
भारताची टी20 टीम : रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), इशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), व्यंकटेश अय्यर, दीपक चहर, शार्दुल ठाकूर, रवी बिष्णोई, अक्षर पटेल, युझवेंद्र चहल, वॉशिंग्टन सुंदर, मोहम्मद सिराज, भुवनेश्वर कुमार, आवेश खान आणि हर्षल पटेल
वेस्ट इंडिजची वन-डे टीम : कायरन पोलार्ड (कर्णधार), केमार रोच, एनक्रुमाह बोनर, ब्रँडन किंग, फॅबियन एलेन, डॅरेन ब्राव्हो, शामराह ब्रुक्स, जेसन होल्डर, शाइ होप, अकील हुसेन, अलझारी जोसेफ, निकोलस पूरन, रोमारियो शेफर्ड, ओडियन स्मिथ आणि हेडन वॉल्श ज्युनिअर
वेस्ट इंडिजच्या भारत दौऱ्याचे वेळापत्रक
एकदिवसीय मालिका
6 फ्रेबुवारी 2022 – अहमदाबाद
9 फेब्रुवारी 2022 – अहमदाबाद
12 फेब्रुवारी 2022 – अहमदाबाद
टी-20 मालिका
15 फ्रेब्रुवारी 2022 – कोलकाता
18 फेब्रुवारी 2022 – कोलकाता
20 फेब्रुवारी 2022 – कोलकाता












































































