जिवलग मित्र मंडळ ग्रुपने नाविन्यपूर्ण उपक्रम आयोजित करून निर्माण केली वेगळी ओळख
सांगली ।
महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातील निवडक पदाधिकारी यांना सोबत घेवून जिवलग मित्र मंडळ व्हॉट्सअॅप ग्रुपने सामाजिक बांधिलकीची जाण आणि भान ठेवत नाविन्यपूर्ण उपक्रम आयोजित करून आपली वेगळी ओळख निर्माण करत रविवारी एका अनोख्या स्नेहमेळाव्याचे आयोजन केले.
शैक्षणिक,सामाजिक,उद्योग,पत्रकारिता,महिला,पोलीस,राजकीय,शेतकरी,समाज सेवक व निरनिराळ्या राजकीय पक्षांमध्ये काम करत असलेल्या अनेकविध प्रकारच्या मित्र मंडळींचा जिवलग मित्र मंडळ असा ग्रुप आहे.
इस्लामपूर येथील अण्णासाहेब डांगे इंटर नॅशनल स्कूल येथे जिवलग मित्र मंडळ व्हॉट्सअॅप ग्रुपचा सामाजिक उपक्रम या योजनेअंतर्गत स्नेहमेळावा पार पडला.
जिवलग मित्र मंडळ व्हॉटसाप ग्रुप च्या माध्यमातून राबविण्यात येणारे सर्व नवनवीन सार्वजनिक व सामाजिक उपक्रम अतिशय स्तुत्य आहेत,संकटसमयी धावून जाणारा ग्रुप म्हणून नांव लौकिक प्राप्त होत आहे,असे मत जिवलग मित्र मंडळ ग्रुपचे पदाधिकारी व इस्लामपूर नगरपालिकेचे आरोग्य सभापती विश्वनाथ डांगे यांनी यावेळी व्यक्त केले
यावेळी जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थीनी प्राजक्ता तानाजी खोत हिस सायकल प्रधान करण्यात आली.तसेच शालेय विद्यार्थ्यांना स्कुल दप्तर,आष्टा येथील वृध्दाश्रमात धान्यांचे वाटप,हुतात्मा स्मारक भवन परिसरात आंब्याच्या झाडांचे रोपण,अनाथ आश्रम मधील एका विद्यार्थ्यानीची शालेय वार्षिक फी भरणे,तसेच सकाळी व सायंकाळी च्या वेळेस चालणेसाठी,व्यायामासाठी जाणा-या नागरीकांना विश्रांतीसाठी दर्जेदार बाकडी वाटत करण्यात आली.तसेच कोरोना महामारी काळात व आजही सतत समाज सेवेमध्ये कार्यमग्न आशा वर्कर्स सौ.माया मोहन जाधव,इस्लामपूर,सौ.सुरेखा सयाजी गावडे पेठ, सौ. सुषमा शंकर कांबळे इस्लामपूर,सौ.दिपाली संजय पाटील इस्लामपूर,सौ. निलम अशोकराव नांगरे (पाटील) कापूसखेड या पाच आशा वर्कर्स यांचा सन्मान चिन्ह देवून ग्रुपचे वतीने गौरव करण्यात आला.बसायची बाकडी प्रशासकिय कार्यालय पेठ – सांगली रोड व राजेबागेश्वर येथे एक सन्मानपूर्वक ठेवण्यात आली.
यावेळी महाराष्ट्र पत्रकार संघाचे अध्यक्ष श्री. विलासराव कोळेकर,माजी सरपंच लालासाहेब पाटील,माजी पंचायत समिती सदस्यनंदकुमार पाटील, सौ.प्राजक्ता देशमुख,रामचंद्र पाटील,धनपाल माळी,दिपकराव अडसूळ,प्रशांत पाटील,सौ. सुरेखा गावडे यांनी मनोगते व्यक्त केली.
यावेळी सौ.स्वातीताई मस्के,प्रशांत पाटील, जीवनकुमार जाधव,अबिद मोमीन,उमेश गावडे,सातलिंग मेत्री,परेश पाटील,सुनिल पाटील,महादेव पाटील,श्रीराम मोरे,आनंद यादव,सुभाष पाटील,दिलिप सांडगे,विवेकराव खोत,रामभाऊ पवार यांच्या सह अनेक ग्रुप पदाधिकारी उपस्थित होते.
स्वागत व प्रास्ताविक ग्रुप अॅडमिन नंदकिशोर निळकंठ यांनी केले व कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभार प्रदर्शन ग्रुप अॅडमिन बजरंग कदम यांनी केले.
संयोजन दिपक निळकंठ,विजय कपाळे,मनिष जाधव,अभिजीत नांगरे,जगदीश कुशिरे,संजय शेवाळे,कृष्णात खोत यांनी केले.