Last Updated on 13 Mar 2026 3:32 PM by Sanjay Patil/Adhorekhit
राजारामबापू कारखान्याचे अध्यक्ष प्रतीक पाटील यांच्या हस्ते सत्कार
ईश्वरपूर ।
येथील राजारामबापू इनडोअर स्टेडियमचा खेळाडू समर्थ श्रीकांत सावंत, कुणाल किशोर जेजुरकर यांनी डेरवण (ता.चिपळूण) येथे झालेल्या राज्यस्तरीय बॅडमिंटन युथ गेम स्पर्धेत घवघवीत यश मिळविले आहे. राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रतिकदादा पाटील यांच्या हस्ते दोन्ही खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. दोन्ही खेळाडूंनी यापूर्वी ही अनेक स्पर्धा गाजवीत अनेक बक्षिसे पटकाविली आहेत. भविष्यातही हे खेळाडू आपल्या साखर कारखान्याचा मोठा नांवलौकिक करतील,असा विश्वास प्रतिकदादा पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.
डेरवण (ता.चिपळूण) येथे नुकतीच राज्यस्तरीय बॅडमिंटन युथ गेम स्पर्धा झाली. या स्पर्धेत समर्थ श्रीकांत सावंत याने १७ वर्षा खालील गटात रौप्य पदक, तर १५ वर्षाखालील गटात कास्य पदक पटकाविले आहे. तसेच कुणाल किशोर जेजुरकर याने १५ वर्षाखालील गटात रौप्य पदक पटकाविले आहे. दोन्ही खेळाडूंना प्रशिक्षक सचिन भिलारे यांचे प्रशिक्षण व मार्गदर्शन मिळाले आहे. रत्नागिरीचे जिल्हा पोलीस प्रमुख श्री.बेले व चिपळूणचे सहाय्य्क पोलीस निरीक्षक आबासो पाटील यांच्या हस्ते दोन्ही खेळाडूंना बक्षीस वितरण करण्यात आले आहे.












































































