Last Updated on 13 Mar 2026 2:42 PM by Sanjay Patil/Adhorekhit
मुंबई ।
महाराष्ट्र शेतजमिनीसंदर्भातील १९६१ च्या कायद्यानुसार भूमीहीन शेतकऱ्यांना तसेच माजी सैनिकांना जमीन देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या जमिनी वर्ग दोन मधून वर्ग एक मध्ये रुपांतरीत (फ्री होल्ड) करण्याबाबत शासन सकारात्मक असून याबाबतची प्रक्रिया शासन स्तरावर सुरू आहे. कमीत कमी दरात या जमिनी फ्री होल्ड करण्याबाबत शासन स्तरावर मार्च अखेरपर्यंत निर्णय घेण्यात येईल, असे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत सांगितले.
सदस्य श्वेता महाले यांनी यासंदर्भातील प्रश्न उपस्थित केला होता.
हेही वाचा – सावधान! राज्यात मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, भूमीहीन शेतकरी तसेच माजी सैनिकांना दिलेल्या वर्ग दोनच्या जमिनी वर्ग एकमध्ये रुपांतरीत करण्याबाबत नियम अंतिम करण्यापूर्वी ११ फेब्रुवारी २०२६ पर्यंत जनतेच्या सूचना/ आक्षेप/ हरकती मागविण्यात आल्या होत्या. त्याअनुषंगाने याबाबत विधि व न्याय विभागाकडूनही मत मागविण्यात आले. त्यानुसार शासन स्तरावर निर्णय घेऊन मार्चअखेर याबाबत अधिसूचना निर्गमित करण्याची कार्यवाही करण्यात येईल.












































































