Last Updated on 11 Mar 2026 8:35 PM by Sanjay Patil/Adhorekhit
ईश्वरपूर ।
बहे (ता. वाळवा) येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी सौ.धनश्री विष्णू थोरात यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
उपसरपंच दिलीप देशमुख यांनी इतर सदस्यांना संधी मिळावी म्हणून राजीनामा दिल्याने हे पद रिक्त झाले. या पदाच्या निवडीसाठी ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच संतोष दमामे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत उपसरपंचपदी सौ.धनश्री थोरात यांची बिनविरोध निवड झाली. सरपंच दमामे, ग्रामपंचायत अधिकारी अशोक खोत व सदस्यांनी नूतन उपसरपंच सौ. थोरात यांचे अभिनंदन केले.व मावळते उपसरपंच देशमुख यांचा सत्कार करण्यात आला. नवनिर्वाचित उपसरपंच सौ. थोरात यांचे ग्रामस्थांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.

गावाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि ग्रामस्थांच्या प्रश्नांचा निपटारा करण्यासाठी सर्व सदस्यांना विश्वासात घेऊन काम करणार असल्याचे नूतन उपसरपंच थोरात यांनी यावेळी सांगितले. दरम्यान, नूतन उपसरपंच थोरात यांनी राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या पुतळ्यास अभिवादन केले.










































































