Last Updated on 19 Feb 2026 8:34 PM by Sanjay Patil/Adhorekhit
ईश्वरपूर ।
येथील वाळवा तालुका एज्युकेशन सोसायटी संचलित विद्यामंदिर ज्युनिअर कॉलेज (सायन्स व्होकेशनल) तसेच खासदार एस. डी. पाटील विद्यामंदिर ज्युनिअर कॉलेज (सेल्फ फायनान्स) यांच्या विद्यामंदिर IIT & NEET अकॅडमी अंतर्गत MHT-CET २०२६ साठी क्रॅश कोर्स सुरू करण्यात येत आहे. हा क्रॅश कोर्स २६ फेब्रुवारी पासून सुरू होणार असून ऑनलाइन टेस्ट बॅच ११ मार्च २०२६ पासून प्रारंभ होणार आहे.
अकॅडमीने यापूर्वीच्या निकालात ९० टक्के पर्सेंटाइलपेक्षा जास्त गुण मिळवणारे ३० हून अधिक विद्यार्थी घडविल्याचा दावा केला आहे. दीपक आचरे (९९.६३ टक्के, रिया पाटील (९९.५४ टक्के), मिताली पाटील (९९ टक्के) आणि पार्थ काटकर (९९ टक्के) यांनी उल्लेखनीय यश संपादन केल्याचे पोस्टरमध्ये नमूद करण्यात आले आहे.
अभ्यासक्रमाची वैशिष्ट्ये
क्रॅश कोर्स तीन टप्प्यांत राबविण्यात येणार आहे.
फेज I – कॉन्सेप्ट बिल्डिंग :
पहिल्या दिवशी ४.५ तास संकल्पना बांधणी सत्र, दुसऱ्या दिवशी विषयानुसार चाचणी तसेच त्याच दिवशी मूल्यमापन व चर्चा करण्यात येणार आहे.
फेज II – पहिल्या प्रयत्नापूर्वी चाचणी :
२५ विषयानुसार चाचण्या, १२ पूर्ण अभ्यासक्रम चाचण्या, फीडबॅक सिस्टीम आणि परीक्षा वातावरणाचा अनुभव दिला जाणार आहे.
फेज III – पहिल्या प्रयत्नानंतर :
पहिल्या प्रयत्नानंतर मार्गदर्शन, दुसऱ्या प्रयत्नाची रणनीती आणि १२ पूर्ण चाचण्या घेण्यात येणार आहेत.
स्पर्धा परीक्षेची प्रभावी तयारी, नियमित चाचण्या आणि सविस्तर विश्लेषण या माध्यमातून विद्यार्थ्यांना CET परीक्षेत उच्च गुण मिळविण्यास मदत होणार असल्याचे संस्थेकडून सांगण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी ९०११९ ८३१३१, ९१४५९ १०१६० आणि ९०२२७ ४५४५२ या क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.












































































