Last Updated on 03 Feb 2026 8:43 AM by Sanjay Patil/Adhorekhit
सातारा ।
कराड येथील अवनिश मयूर माने याने 21 व्या राष्ट्रीय अबॅकस आणि मेंटल अर्थ मॅटिक स्पर्धेत देशात तिसरा क्रमांक पटकावत घवघवीत यश मिळवले आहे. या यशामुळे कराड शहरासह सातारा जिल्ह्याचे नाव राष्ट्रीय पातळीवर उज्ज्वल झाले आहे.
देशभरातील विविध राज्यांतून हजारो विद्यार्थ्यांनी या राष्ट्रीय स्पर्धेत सहभाग घेतला होता. वेगवान गणिती कौशल्य, अचूकता आणि मानसिक गणनाशक्तीच्या जोरावर अवनिश माने याने तिसरे स्थान मिळवून आपली गुणवत्ता सिद्ध केली. तो पोदार इंटरनॅशनल स्कूलमध्ये इयत्ता ५ वी इयत्तेत शिकत आहे. चार्टर्ड अकाउंटंट मयूर माने यांचा तो मुलगा आहे.
अवनिशच्या या यशाबद्दल त्याचे पालक, शिक्षक आणि मार्गदर्शकांनी विशेष अभिनंदन केले आहे.












































































