Last Updated on 02 Jan 2026 9:31 AM by Sanjay Patil/Adhorekhit
श्री समर्थ प्लाझा सह. गृहनिर्माण संस्थेच्या वतीने नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव यांचा सत्कार
कराड ।
कराडकर नागरिकांनी भरभरून प्रेम देऊन मोठ्या मताधिक्याने निवडून दिले. आपल्यासारख्या सर्वच सुजाण लोकांनी नगराध्यक्ष पदाची संधी दिली यामुळे कराडचा विकासात्मक सर्वांगीण विकास करणार असा आत्मविश्वास लोकनियुक्त नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव यांनी व्यक्त केला
मंगळवार पेठेतील श्री समर्थ प्लाझा सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या वतीने लोकनियुक्त नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव यांचा यथोचित सत्कार करण्यात आला यावेळी ते बोलत होते.
साडेतीनशे कोटी रुपयाचे विकासात्मक कामे सुरू असून या पुढील काळामध्ये राज्य शासनाकडून अधिक निधी मिळवून कराडचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आपला प्रयत्न राहील. त्याचबरोबर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री शंभूराज देसाई, माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांचे मार्गदर्शन नेहमीच मला असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली कराडचा विकासात्मक चेहरामोहरा बदलला जाईल यासाठी आपण सातत्याने प्रयत्न करीत राहणार आहोत अशी हमी ही नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव यांनी दिली.
श्री समर्थ प्लाझा सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या अध्यक्ष श्री सूर्यकांत जमदाडे, सदानंद भुर्के, सौ. अर्चना भुर्के, संजय सुर्यवंशी, सौ.माधूरी जमदाडे, कृष्णराव पवार, सौ. रेखा वाघमारे, संजय दिक्षीत, गोरख तावरे, रजनीकांत शेंबडे, उत्कर्ष तावरे उपस्थित होते.










































































