Last Updated on 19 Dec 2025 6:37 PM by Sanjay Patil/Adhorekhit
![]()
आविष्कार कल्चरल ग्रुपकडून ‘स्वरांजली’ संगीत कार्यक्रमाचे आयोजन
मनिष राजगिरे, वैभव वशिष्ठ व मंजिरा गांगुली यांचे सादरीकरण
कोमल कृष्णा प्रस्तुत ‘स्वरांजली’ कार्यक्रमाची उत्सुकता शिगेला
![]()
सांगली । पश्चिम महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रात गेल्या पंचवीस वर्षांपासून सातत्यपूर्ण यशस्वी वाटचाल करीत असलेल्या उरुण ईश्वरपूर येथील “आविष्कार कल्चरल ग्रुप”ने कोमल कृष्णा प्रस्तुत “स्वरांजली” हा हिंदी- मराठी गीतांचा बहारदार कार्यक्रम शनिवार दि.२७ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी ६.३० वाजता आयोजित केला आहे.
‘धर्मवीर’ फेम,हिंदी- मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीचा युवा गायक मनिष राजगिरे,वैभव वशिष्ठ आणि आघाडीची युवा गायिका मंजिरा गांगुली हे हिंदी-मराठी गीते सादर करणार आहेत. हा कार्यक्रम खा.एस.डी.पाटील नगरातील विद्या मंदीर हायस्कूलच्या प्रांगणात होणार आहे.
माजी मंत्री आ.जयंतराव पाटील,युवा नेते प्रतिकदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आविष्कार कल्चरल ग्रुपने गेल्या २५ वर्षात देशातील आघाडीच्या प्रतितयश गायक – गायिकांच्या कार्यक्रमांचे आयोजन केलेले आहे. आविष्कारने आ.जयंतराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त फेब्रुवारी २०२५ मध्ये २३ वा संगीत महोत्सव आयोजित केला आहे. स्वरांजली हा या वर्षातील शेवटचा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाचा आस्वाद कला रसिकांनी घ्यावा,असे आवाहन आविष्कार चे अध्यक्ष प्रा.कृष्णा मंडले,सचिव विजय लाड यांनी केले आहे.
आविष्कारचे प्रमुख मोहन चव्हाण,उपाध्यक्ष राजेंद्र माळी, कार्याध्यक्ष भूषण शहा,सहसचिव विजय नायकल,खजिनदार विश्वास कदम,माजी अध्यक्ष सतिश पाटील,प्रा.प्रदीप पाटील,सचिन पाटील,संतोष पाटील,धनंजय भोसले,लव्हाजी देसाई,राजवर्धन लाड,अनिल पाटील,विश्वजित पाटील,बालाजी पाटील,संजय पाटील,महेश पाटील,विश्वनाथ पाटसुते,विनायक यादव,सौरभ सावंत, हर्षवर्धन घोरपडे,श्रेयस पाटील,अजय थोरात, प्रताप कवठेकर यांच्यासह आविष्कारचे कार्यकर्ते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेत आहेत.
![]()










































































