सांगली । समर्थ को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड, इस्लामपूरतर्फे ग्राहकांना सेवा व प्रोत्साहन देण्यासाठी आयोजित वाहन वितरण कार्यक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात यश दुकाने यांना किया सोनेट हे वाहन सुपूर्द करण्यात आले.
वाहनाचे पूजन यशवंत ग्लुकोज शिराळा चे संचालक उदय रामचंद्र मुळीक, संस्थेचे चेअरमन संदीप पाटील, तसेच संचालक संताजी गावडे, संतोष देसाई, प्रदीप मुसळे, अमर पठाण यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी संस्थेचे कर्मचारी व दैनंदिन बचत प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संस्थेचे चेअरमन संदीप पाटील यांनी या प्रसंगी बोलताना सांगितले की, “ग्राहकांचा विश्वास हेच संस्थेचे बळ आहे. समर्थ को-ऑपरेटिव्ह नेहमीच सदस्यांच्या गरजांना प्राधान्य देत कार्यरत आहे.”
आयोजन संस्थेच्या कर्मचारी वर्गाने केले. शेवटी उपस्थित सर्वांनी नव्या वाहनासाठी यश दुकाने यांना शुभेच्छा दिल्या.
 
                                                                     
							












































































