सांगली । वाळवा तालुका एज्युकेशन सोसायटी इस्लामपूर येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयातील हिंदी विषयाचे सहयोगी प्राध्यापक व विभाग प्रमुख डॉ. गोरखनाथ किर्दत यांना हिंदुस्तानी प्रचार सभा मुंबई यांचा सन 2025 चा महात्मा गांधी शिक्षा प्रतिभा सन्मान पुरस्कार नुकताच जाहीर झाला.
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी सन 1942 साली अहिंदी भाषिक क्षेत्रामध्ये हिंदी भाषेचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी या संस्थेची स्थापना केली असून त्या माध्यमातून अहिंदी भाषिक क्षेत्रामध्ये हिंदी भाषेचा प्रचार प्रसार करणाऱ्या दक्षिण भारतातील काही निवडक हिंदी शिक्षकांना या पुरस्काराने प्रतिवर्षी सन्मानित केले जाते. प्राध्यापक गोरखनाथ किर्दत यांचे हिंदी भाषेतील संशोधन अध्ययन अध्यापन या कामाची दखल घेऊन हा पुरस्कार जाहीर करण्यात आला असून दिनांक 14 ऑगस्ट 2025 रोजी हिंदुस्तानी प्रचार सभेचे कार्यालय मुंबई येथे याचे सन्मानपूर्वक वितरण होणार आहे.
त्यांच्या या यशामध्ये वाळवा तालुका शिक्षण संस्थेचे मानसचिव एडवोकेट बी. एस. पाटील (अण्णा ),सहसचिव एडवोकेट धैर्यशील पाटील (बाबा ) यांची प्रेरणा व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरुण जाधव यांचे मार्गदर्शन लाभले.