सांगली । कणेगांव ( ता.वाळवा) येथील चार शेतकऱ्यांच्यावर कोल्ह्याने हल्ला करून त्यांना जखमी केले. या शेतकऱ्यांना इस्लामपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता, माजी मंत्री आ.जयंत पाटील यांनी उपजिल्हा रुग्णालयात जाऊन जखमी शेतकऱ्यांची विचारपूस केली, त्यांना धीर दिला. इस्लामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती अँड.विश्वासराव पाटील त्यांच्यासोबत होते.
हर्षवर्धन बाळासाहेब पाटील,माया तानाजी साळूंके,प्रदीप शिवाजी पाटील,संतोष अशोक जाधव अशी या जखमी शेतकऱ्यांची नांवे आहेत. यातील दोन शेतकऱ्यांना कोल्ह्याने चावा घेतला असून दोन शेतकऱ्यां ना अंगावर ओरखडले आहे. त्यांना सहा-सहा इंजेक्शन चा कोर्स सुरू केला आहे.
याप्रसंगी उपजिल्हा रुग्णालयाचे डॉ.पाटील, कणेगांवचे अशोक पाटील,शिवराज मोरे, सर्पमित्र युनूस मणेर यांच्यासह नातेवाईक उपस्थित होते.