मुंबई । भारतीय स्वातंत्र्य चळवळी मध्ये क्रांतिसिंह नाना पाटील यांचे मोठे योगदान आहे. मी राज्यमंत्री असताना क्रांतिसिंह नाना पाटील यांचे जिवंत स्मारक म्हणून पेठ ता. वाळवा जि. सांगली येथे क्रांतिसिंह नाना पाटील शासकीय अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय मंजूर करून घेतले. वारंवार शासनाकडे पाठपुरावा केल्यामुळे 70 टक्के काम पूर्ण झालेले असून अपुऱ्या निधीमुळे जवळपास 30 टक्के काम अजूनही अपूर्ण आहे. त्यामुळे महाविद्यालय सुरू करण्यात आलेले नाही. उर्वरित बांधकाम तात्काळ पूर्ण होऊन प्रवेश प्रक्रिया सुरू करणेबाबत आज राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्याकडे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
बैठकीदरम्यान सदर महाविद्यालयाचा संपूर्ण आढावा घेतल्यानंतर कृषी मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना आदेश दिले की, सांगली जिल्ह्यातील क्रांतिसिंह नाना पाटील शासकीय अन्नतंत्रज्ञान महाविद्यालय, पेठच्या कामांना तात्काळ निधी वितरीत करून या महाविद्यालयाचे काम सुरू करा. यामध्ये दिरंगाई करू नका, राहिलेले काम प्राधान्याने करून लवकर महाविद्यालय सुरू करावे.
बैठकीमध्ये राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात कृषी मॉल उभारण्यासाठी सार्वजनिक खासगी भागीदारी या धोरणावर आधारित धोरण तयार करण्याबाबत चर्चा झाली. आमदार सदाभाऊ खोत यांनी देखील याचे समर्थन करत कृषीच्या सर्व वस्तू शेतक-यांना एकाच ठिकाणी उपलब्ध होतील आणि कृषी माल देखील याच ठिकाणी विक्री देखील होईल, त्यामुळे हा एक ऐतिहासिक निर्णय घेतल्यास शेतकऱ्यांना एक नवी उभारी मिळेल असे सांगितले.
या मॉलमुळे शेतक-यांना नवीन बाजारपेठ उपलब्ध होईल व शहरातील नागरिकांना शेतक-यांना उत्पादित केलेला भाजीपाला, फळे, तृणधान्य, कडधान्य व इतर कृषि आधारित उत्पादने थेट व माफक दरात खरेदी करता येतील. याच धर्तीवर राज्यात देखील कृषी विभागाकडे उपलब्ध असलेल्या जमिनीवर प्रत्येक जिल्ह्यात कृषी मॉल उभारल्यास शेतक-यांना याचा फायदा होईल त्यांचा वेळ वाचून त्यांना सर्व कृषी माल विक्री व कृषीसाठी लागणा-या सर्व सहसाहित्य एकाच ठिकाणी उपलब्ध होईल.
या बैठकीस राज्याची कृषिमंत्री माणिकराव कोकाटे, आमदार सुभाष देशमुख, आयुक्त सूरज मांढरे, त्याचप्रमाणे कृषी विभागाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.
Recent Posts
बातमी शेअर करा : गटविकास अधिकारी आर. बी. पांढरे यांची बदली सांगली । वाळवा पंचायत पंचायत समितीचे गटविकास अधिकारी आर. बी. पांढरे यांची बदली झाली आहे. वाळवा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी म्हणून डॉ. आबासाहेब प... Read more