सांगली | इस्लामपुर येथील वाळवा तालुका एज्युकेशन सोसायटीच्या यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात २०२५-२६ या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर संलग्न असलेल्या या महाविद्यालयात विविध पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी प्रवेश खुले असून ग्रामीण भागातील गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी हे महाविद्यालय विशेष ओळखले जाते.
महाविद्यालयात B.A., B.Com., B.Sc., B.C.S., B.Com (IT), B.B.A., B.C.A., M.Com., M.C.A. तसेच Diploma in Taxation (DIT) हे अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. संगणकशास्त्र, वाणिज्य, विज्ञान आणि प्रशासन क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी ही उत्तम शैक्षणिक संधी आहे.
आधुनिक सोयी-सुविधा महाविद्यालयाचे खास वैशिष्टये
प्रशस्त व सुसज्ज इमारत, अत्याधुनिक संगणक लॅब, स्मार्ट क्लासरूम्स, अद्ययावत लायब्ररी, स्वच्छ व सुरक्षित लेडीज होस्टेल, तसेच १००% निकालाची परंपरा हे या संस्थेचे विशेष आकर्षण आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी गरजेनुसार स्पोकन इंग्लिश, सॉफ्ट स्किल्स, हार्डवेअर नेटवर्किंग, टॅली विथ GST, टायपिंग, बँकिंग व इन्शुरन्स, सायबर सिक्युरिटी, अॅडव्हान्स एक्सेल आणि शेअर मार्केट व म्युच्युअल फंड यांसारखे पूरक अभ्यासक्रमही दिले जातात.
हेही वाचा – इस्लामपूर : यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या २१ विद्यार्थ्यांची नामांकित कंपन्यात निवड
प्लेसमेंटसाठी विशेष प्रयत्न
विद्यार्थ्यांना नोकरीची संधी मिळावी यासाठी विविध नामांकित कंपन्यांचे प्लेसमेंट ड्राईव्ह आयोजित केले जातात. शिवाजी विद्यापीठाच्या गुणवत्तापूर्वक शिष्यवृत्त्या, सरकारी योजनांची सोय आणि विद्यार्थ्यांसाठी सतत मार्गदर्शन हे यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाचे आणखी एक बलस्थान आहे.
प्रवेशासाठी संपर्क :
महाविद्यालयाची अधिकृत वेबसाईट www.ycmislampur.ac.in किंवा ईमेल yccislampur@gmail.com वरून माहिती मिळू शकते.