सांगली । इस्लामपूर येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयामार्फत चालवल्या जाणाऱ्या प्लेसमेंट सेलच्या मदतीने आय-प्रो ट्रेनिंग आणि प्लेसमेंट मध्ये प्रशिक्षणास असणाऱ्या २१ विद्यार्थ्यांची निवड वेगवेगळ्या नामांकित कंपन्यांमध्ये झाली आहे.
महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना पदवी व पदव्युत्तर शिक्षणाबरोबरच महाविद्यालयाने प्लेसमेंट सेल निर्माण केला आहे. यामध्ये नामांकित कंपन्यांना निमंत्रित करून विद्यार्थ्यांना नोकरीसाठी, करिअर साठी संधी देण्याचा प्रयत्न केला जातो. त्या अंतर्गत आता महाविद्यालयाच्या २१ विद्यार्थ्यांना ओरिएंट टेक, विप्रो लिमिटेड, प्लॅनेट टीसीआय इन्फो लिमिटेड, इम्पॅक्ट इन्फोटेक, आयसी आयसीआयसीआय बँक, इननोव टेक प्रायव्हेट लिमिटेड या सर्व कंपन्यांमध्ये असोसिएट इंजिनिर, सिनिअर ऑफिसर, डेस्कटॉप सपोर्ट इंजिनिर या पदांवरती नियुक्ती मिळाली आहे.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. एम. जाधव यांनी सर्व निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा गौरव केला.ही निवड विद्यार्थ्यांना नोकरीच्या नवीन संधी आणि त्यांच्या आयुष्यामध्ये उज्वल करिअर देणारी एक उत्तम संधी असेल असे मत व्यक्त केले. या निवडीसाठी आय-प्रो ट्रेनिंग व प्लेसमेंट सेलचे अभय माने यांचे विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्याकरिता त्यांचे देखील विशेष आभार मानण्यात आले.
निवडीसाठी संस्थेचे सहसचिव ॲड.धैर्यशील पाटील, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए.एम जाधव, तसेच प्रा. एस. आर. माने, प्लेसमेंट सेवा विभाग प्रमुख पी.जे. इनामदार, महाविद्यालयाचे संगणक व व्यवस्थापन समन्वयक प्रा.एस. एस.पाटील व सर्व विभाग प्रमुख यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.