कमी दाबाच्या पट्ट्यामुळे २१ ते २४ मे दरम्यान अरबी समुद्र खवळण्याची शक्यता
मुंबई । महाराष्ट्र आणि गोव्या जवळ अरबी समुद्रात 21 मेपासून कमी दाबाचा पट्टा तयार होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. 24 मेपर्यंत तो अधिक तीव्र होऊन उत्तरेकडे सरकू शकतो. राज्याच्या किनाऱ्याला थेट धोका नसला तरी याचा परिणाम म्हणून समुद्र खवळलेला राहण्याची शक्यता आहे.
22 ते 24 मे दरम्यान रायगड, रत्नागिरी, मुंबई आणि पालघरजवळ समुद्र खवळू शकतो, तर खोल समुद्रात जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे मासेमाऱ्यांनी हवामान बदलांवर लक्ष ठेवून या काळात खोल समुद्रात जाणे टाळावे, असा इशारा आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिला आहे.
21 ते 24 मे दरम्यान मच्छीमारांनी घ्यावयाची सावधगिरी






