‘राजारामबापू’च्या शेतकरी मेळाव्यात ऊस विकास समितीचे अध्यक्ष अमरसिंह साळुंखे यांचा सवाल
सांगली । आपल्या शेतीला काय पूरक आहे आणि काय मारक आहे? याचा आपण शेतकऱ्यांनी गांभीर्याने विचार करायला हवा. आपण आता शेती करण्याचा पध्दतीमध्ये आमूलाग्र बदल करण्याची गरज आहे. सध्या इतक्या झपाट्याने शेती क्षारपड होत आहे,मग पुढच्या पिढीला तुम्ही ही क्षारपड जमिनच देणार आहात काय? असा सवाल राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याच्या ऊस विकास समितीचे अध्यक्ष अमरसिंह साळुंखे यांनी बहे (ता.वाळवा) येथील शेतकरी मेळाव्यात केला.
राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याच्या समृध्द भूमी अभियान अंतर्गत जमीन सुधारणा कार्यक्रमात ते बोलत होते. शेती समितीचे अध्यक्ष विठ्ठल पाटील, जलसिंचन समितीचे अध्यक्ष प्रदीपकुमार पाटील, माजी संचालक माणिकराव पाटील, ॲड.कृष्णराव पाटील ,कृष्णेचे संचालक अविनाश खरात, दूध संघाचे संचालक अनिल खरात, सोसायटीचे अध्यक्ष डांगबाबा शिंदे, माजी अध्यक्ष जयदीप पाटील, ऊस विकास अधिकारी सुजयकुमार पाटील, सहाय्यक विवेक पुजारी, जलसिंचन अधिकारी जे.बी. पाटील, गटाधिकारी संग्राम पाटील प्रामुख्याने उपस्थित होते.
अमरसिंह साळुंखे म्हणाले, सध्या शेतीची उत्पादकता कमी होऊन उत्पन्न घटत आहे. मात्र शेतीचा खर्च मोठया प्रमाणात वाढत आहे. आता शेती करताना आपणास शेती तील उत्पादन वाढविताना खर्च कमी कसा होईल याचा विचार करायला हवा. त्यासाठी माती परिक्षणापासून सेंद्रीय खतांच्या वापरा पर्यंत,तसेच पाणी आणि रासायनिक खतांच्या संतुलित वापराबद्दल गांभीर्याने विचार करायला हवा. याचवेळी जमिनीची सुपिकता आणि माणसाचे आरोग्यही जपायला हवे.
यावेळी ऊस विकास अधिकारी सुजयकुमार पाटील,जल सिंचन अधिकारी जे.बी.पाटील, विवेक पुजारी यांनी प्रतीक पाटील यांच्या पुढाकाराने राबविण्यात येत असलेल्या राजारामबापू सच्छिद्र पाईप निचरा प्रणाली योजनेबद्दल सविस्तर माहिती दिली.
प्रारंभी माजी सरपंच बी.जी.पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. सेवा सोसायटीचे उपाध्यक्ष रामचंद्र पाटील यांनी आभार मानले.
याप्रसंगी सिताराम हुबाले, विलासराव पाटील, माजी अध्यक्ष जालिंदर पाटील,जालिंदर देशमुख,आविष्कार नांगरे, रवींद्र बडवे, कुंडलिक खरात, दिनकर पाटील, सयाजी पाटील, प्रविण पाटील, बाळासाहेब वाठारकर, अमर थोरात, धनाजी पाटील, हणमंत नावाडकर, पोपटराव पाटील, जयवंत पाटील, अविनाश पाटील, रोहित तोरस्कर यांच्यासह शेतकरी मोठया संख्येने उपस्थित होते.