पाकिस्तान आणि पीओकेवर हल्ला
नवी दिल्ली | काही वेळापूर्वीच भारतीय सशस्त्र दलांनी ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवून पाकिस्तान आणि पाकव्याप्त जम्मू आणि काश्मीर मध्ये दहशतवादी तळांवर हल्ले केले जिथून भारतावर हल्ला करण्याचा कट आखण्यात आला होता आणि त्याची अंमलबजावणी करण्यात आली.
एकंदर नऊ तळांना लक्ष्य करण्यात आले.
आमची कृती केंद्रित, मोजूनमापून केलेली आणि तणाव वाढू न देणारी आहे. कोणत्याही पाकिस्तानी लष्करी तळाला लक्ष्य करण्यात आले नाही. भारताने या तळांची निवड करताना आणि त्यावर कारवाई करताना अतिशय संयम दाखवला आहे. 25 भारतीय आणि एका नेपाळी नागरिकांची हत्या घडवणाऱ्या क्रूर पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर ही पावले उचलण्यात आली.
‘ऑपरेशन सिंदूर’
या हल्ल्याल ‘ऑपरेशन सिंदूर’ असे नाव देण्यात आले आहे. भारतीय लष्कर आणि हवाई दलाने एकत्रितपणे ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवले. भारताने पाकिस्तानवर केलेला हा हल्ला मध्यरात्री १ वाजून ४४ मिनिटांनी करण्यात आला. भारतीय लष्कराने एका प्रसिद्धीपत्रकात दिलेल्या माहितीनुसार, या कारवाईअंतर्गत, लष्कराने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांना लक्ष्य केले, जिथून भारताविरुद्ध दहशतवादी हल्ले आखले जात होते आणि हल्ल्याचे निर्देश दिले जात होते. या हल्ल्यांमध्ये भारतीय लष्कर, नौदल आणि हवाई दल या तिन्ही दलांच्या अचूक शस्त्र प्रणालींचा वापर करण्यात आला.