सांगली । इस्लामपूर येथील वाळवा तालुका एज्युकेशन सोसायटीच्या विद्यामंदिर हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजने फेब्रु/मार्च २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या इ.१२वी च्या बोर्ड परीक्षेमध्ये उत्तुंग यश मिळवले. महाविद्यालयाचा निकाल ९९ टक्के इतका लागला असून कु. गायत्री नागेश पाटील हिने ९७ टक्के गुण मिळवून इस्लामपूर केंद्रात प्रथम येण्याचा मान मिळवला, मो.नवाज पठाण (९५.३३ टक्के), पार्थ माळी (९५टक्के), कार्तिकी पाटील (९१ टक्के), श्रेया पाटील (९०.६७ टक्के), जिया धुमाळ (९०.६७ टक्के) या विद्यार्थ्यांनी भरघोस गुण मिळवत विद्यामंदिरच्या यशाची परंपरा कायम ठेवली.
इलेक्ट्रिकल मेंटेनन्स (EM) या विषयात एकूण २१ विद्यार्थ्यांनी तसेच क्रॉप सायन्स (Crop Sc.) या विषयात एकूण ५ विद्यार्थ्यांनी २०० पैकी २०० गुण मिळवून राज्यात प्रथम येण्याचा मान मिळवला.
संस्थेचे मानद सचिव ॲड. बी. एस. पाटील, सहसचिव ॲड. धैर्यशील पाटील, प्राचार्य एस. एल. पाटील, विभागप्रमुख एस.एस.पाटील, प्रा एस.आर. नागरगोजे, प्रा बी. ए. शिरोटे, प्रा आर. व्ही. पाटील, व्होकेशनल विभागप्रमुख एम.पी.करळे, प्रा.एस.आर.महिंद, प्रा एम.आर.बडवे, प्रा व्ही.एस.शिंदे, प्रा डी एस मुल्ला, प्रा एच.ए.पाटील, प्रा वाय आर माने, प्रा एस एन पाटील, प्रा एस ए पाटील व प्रा व्ही ए. पाटील, प्रा अनुराधा पवार, प्रा कडबाने डी. सी. प्रा आकांक्षा पाटील, प्रा वंदना पाटील, प्रा सुजाता पाटील, प्रा.माया विभूते, प्रा ऐश्वर्या जाधव,पवार डी. एस. प्रा एस. डी. खोत ,प्रा ढोबळे एस जी, प्रा जाधव व्ही. एच., प्रा मनोज करळे, प्रा अमित दुधाळे, प्रा. धनंजय जाधव, प्रा. अमोल गायकवाड, प्रा.मोहिते पी.आर., प्रा सिसाळे आर.आर., प्रा एस. पी. पाटील तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर सेवकांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.