सांगली । सायबर स्क्वेअर व दुबई युनिर्वसिटी यांच्या वतीने दि.१० मे २०२५ रोजी दुबई येथे होणार्या ५ व्या ग्लोबल डिजीटल फिस्टमध्ये इस्लामपूर येथील प्रकाश पब्लिक स्कुलच्या विद्यार्थ्यांनी बनविलेल्या इलेक्ट्रिक व्हेईकल प्रोजेक्टची निवड झाली आहे,या प्रोजेक्टसाठी इयत्ता ९ वी चे विद्यार्थी रुद्र किरण सुळे व पृथ्वीराज अविनाश पाटील या विद्यार्थ्यांची निवड झाली असुन विद्यार्थी व प्रकाश पब्लिक स्कुलवर शैक्षणिक क्षेत्रातुन अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
सायबर स्क्वेअर हि एक आय टी कंपनी असुन विद्यार्थासाठी शैक्षणिक अभ्यासक्रम तयार करते,शिक्षकांना ट्रेनिंग देते याचबरोबर प्रोजेक्टसाठी विद्यार्थांना प्रोत्साहान देऊन विद्यार्थाच्या कल्पनेनुसार प्रोजेक्टची साधणे पुरविली जातात,प्रकाश पब्लिक स्कुल इस्लामपुर हे सायबर स्क्वेअर अभ्यासक्रम सुरु करणारे व रोबोटिक्स लॅब तयार करणारे महाराष्ट्रातील पहिले स्कुल आहे.
दुबई येथे होणार्या ५ व्या ग्लोबल डिजीटल फिस्टमध्ये जगभरातुन विविध प्रोजेक्ट घेऊन नामांकीत स्कुलचे विद्यार्थी सहभागी होणार आहेत.या ग्लोबल डिजीटल फिस्ट मध्ये प्रकाश पब्लिक स्कुलचे विद्यार्थी इलेक्ट्रिक व्हेईकल हा प्रोजेक्ट तीन टप्प्यात सादर करणार आहेत.पहीला टप्पा हा मिनेअजर इलेक्ट्रिक व्हेईकल (MEW),दुसरा टप्पा काॅम्पॅक्ट व्हेईकल(CEV),तिसरा टप्पा इलेक्ट्रिक व्हेईकल (EV) हा आहे.
इलेक्ट्रिक व्हेईकल हि सर्वसामान्यापासुन उच्च दर्जाच्या नोकरदारांसाठी ही उपयुक्त आहे,हि कार आपण इंटरनेट ॲप व्दारे चालवु शकतो,गाडी पार्कींग करुन अन्य ठिकाणी कामासाठी गेलो तरीही त्या ठिकाणाहुन गाडीची पार्कींग लोकेशन बदलता येते अशी प्रोजेक्टची खास वैशिष्ठे आहेत.
हा प्रोजेक्ट यशस्वी करण्यासाठी प्रकाश पब्लिक स्कुलचे संस्थापक निशिकांत भोसले-पाटील, स्कुलच्या प्रशाशिका सौ.सुनिता निशिकांत भोसले- पाटील, स्कुलचे प्राचार्य मधुकुमार ए.नायर, उपप्राचार्या सिंधु नायर, संगणक विभागप्रमुख सुनीतसर यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले. या विद्यार्थ्यांचे शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी,विद्यार्थी, पालक यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.