भारताचा 10 गडी आणि 13 चेंडू राखून पराभव
बाबर आणि रिझवानने भारताकडून विजय हिसकावून घेतला
दुबई :
T20 विश्वचषकाच्या पहिल्याच सामन्यात भारताला पराभवाला सामोरे जावे लागले.पाकिस्तानने भारताचा 10 विकेट्सने पराभव केला आहे. पाकिस्तान संघाने 13 चेंडू शिल्लक असताना सामना जिंकला. बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान यांनी शानदार फलंदाजी केली.
भारत-पाकिस्तान महामुकाबल्यात भारताला मोठा धक्का बसला आहे. विश्वचषकाच्या इतिहासात पहिल्यांदाच पाकिस्तानच्या संघाने भारताचा वाईट पद्धतीने पराभव केला आहे. 152 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानच्या सलामीवीरांनी दणदणीत फलंदाजी करताना सामना एकतर्फी केला. बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान या दोघांनीही टीम इंडियाच्या गोलंदाजांना संधी दिली नाही.बाबर आझमने 52 चेंडूत नाबाद 68 आणि मोहम्मद रिझवानने 55 चेंडूत नाबाद 79 धावा केल्या. पाक संघाने 13 चेंडू आधीच सामना जिंकून आपल्या नावावर केले.
कोणत्याही विश्वचषकात भारतावर पाकिस्तानचा हा पहिला विजय आहे. T20 विश्वचषकात दोघांमध्ये सहा सामने झाले आहेत. यापैकी पाच भारत आणि पाकिस्तानने एक सामना जिंकला आहे.
तत्पूर्वी,भारताने पाकिस्तानला विजयासाठी 152 धावांचे लक्ष्य दिले आहे.भारतीय संघाने 20 षटकात 7 विकेट गमावत 151 धावा केल्या.विराट कोहलीने कर्णधारपदाची खेळी खेळली.त्याने 49 चेंडूत 5 चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 57 धावा केल्या.
अत्यंत महत्त्वाच्या सामन्यात सुरुवातीलाच खराब सुरुवात आणि सुमार फलंदाजीमुळे भारतीय संघ पराभूत झाला. आधी खराब फलंदाजीमुळे केवळ 151 धावा भारताने केल्या. ज्यानंतर पाकिस्तान संघाने अप्रतिम अशी फलंदाजी करत सामना 10 विकेट्सने खिशात घातला.
- रोहित शर्मा टी -20 मध्ये सातव्यांदा शून्यावर बाद झाला.
- पॉवरप्लेपर्यंत भारताची धावसंख्या 36/3 होती.
- मोहम्मद रिझवानने टी -20 फॉरमॅटमध्ये आपले 100 कॅच पूर्ण केल्या.
- डावाच्या 12 व्या षटकात ऋषभ पंतने हसन अलीच्या षटकात एका हाताने दोन षटकार ठोकले.
- टीम इंडियाने शेवटच्या 5 षटकात 51 धावा केल्या.
दोन्ही संघ-
भारत- विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, केएल राहुल, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार, वरुण चक्रवर्ती.
पाकिस्तान – बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान, फखर जमान, मोहम्मद हाफीज, शोएब मलिक, आसिफ अली, इमाद वसीम, शादाब खान, हसन अली, शाहीन शाह आफ्रिदी, हरिस रौफ.