उन्हाळ्यात गिझर बंद ठेवणं ही फक्त वीजबचतीची गोष्ट नाही, ती तुमच्या आणि तुमच्या कुटुंबाच्या सुरक्षिततेशी जोडलेली आहे. त्यामुळे उन्हाळा सुरू झाला की, गिझरकडे दुर्लक्ष न करता त्याचा वापर अगदी गरज असेल तितकाच करा – तेही काळजीपूर्वक!
घरात गिझर चालू ठेवून तुम्ही बाहेर गेला आहात आणि आठवण आली, की गिझर अजूनही सुरू आहे! अशा वेळी काळजाचा ठोका चुकतो. विजेचा अपव्यय, ओव्हरहिटिंगचा धोका आणि उपकरणांची आयुष्य कमी होण्याची शक्यता – हे सगळं केवळ एका विसरामुळे घडू शकतं. मात्र आता यावर स्मार्ट उपाय उपलब्ध झाले आहेत – स्मार्ट टायमर आणि Wi-Fi स्विचेस!
गिझरसाठी वापरले जाणारे हे Wi-Fi स्मार्ट स्विच आणि IoT आधारित टायमर स्विचेस घरात नसतानाही मोबाईलवरून गिझर कंट्रोल करण्याची सोय देतात. टायमर सेट करून गिझर ठराविक वेळेनंतर आपोआप बंद होतो, तर काही डिव्हाइसेस तुमचं घरातलं वीज नियंत्रण संपूर्ण मोबाईलवर आणतात.
1. वीजेचा मोठ्या प्रमाणात अपव्यय
उन्हाळ्यात घरातील तापमान आधीच वाढलेलं असतं. त्यात गिझर सतत चालू राहिल्यास वीजेचा अनावश्यक वापर होतो. एक सरासरी गिझर प्रति तास 1500 ते 2000 वॅट्स इतकी ऊर्जा वापरतो. दिवसभर गिझर सुरू राहिला तर वीजबिलात हजारोंची भर पडू शकते.
2. उपकरणाचे आयुष्य कमी होते
गिझरची रचना विशिष्ट तापमानावर पाणी गरम करण्यासाठी केलेली असते. सतत गरम पाण्याचा ताण पडल्याने थर्मोस्टॅट खराब होण्याची शक्यता वाढते. हीटिंग कॉइलदेखील लवकर जळते, आणि गिझर वारंवार बिघडू लागतो.
3. आग किंवा शॉर्टसर्किटचा धोका
गिझर ही एक हाय-पॉवर इलेक्ट्रिक डिव्हाइस आहे. उन्हाळ्यात इलेक्ट्रिक वायरिंग अधिक गरम होते. गिझर लांब वेळेपर्यंत चालू राहिल्यास वायरिंगवर ताण येतो. थोडीशी तांत्रिक अडचण किंवा वायरची झीज झाल्यास शॉर्टसर्किट, स्पार्किंग किंवा आगीचा धोका संभवतो.
4. अनावश्यक उष्णता आणि पर्यावरणावर परिणाम
उन्हाळ्यात घरात तापमान नियंत्रणात ठेवणं महत्त्वाचं असतं. गिझरमधून उत्सर्जित होणारी उष्णता घरातले तापमान आणखी वाढवते. त्यामुळे एसी, कूलर वापरण्याची गरज भासते आणि त्यामुळे एकूण ऊर्जा वापर वाढतो.
5. पाण्याचा अपव्यय
गिझर सतत ऑन असेल तर पाण्याचा तापमान नियंत्रित राहिलेला नसतो. गरम पाण्याचा थेट वापर होऊ शकत नाही. त्यामुळे गरम पाणी न वापरता त्याचा अपव्यय होतो.
काय उपाय करावेत?
1. स्विच ऑफ करण्याची सवय लावा
गिझर वापरून झाल्यावर लगेच ‘स्विच ऑफ’ करण्याची सवय लावा. शक्य असल्यास त्याचा प्लगही काढून ठेवा.
2. स्मार्ट टायमर किंवा ऑटो कट स्विच
गिझरला स्मार्ट स्विच लावल्यास तो ठराविक वेळेनंतर आपोआप बंद होतो. आधुनिक गिझरमध्ये ‘ऑटो कट फीचर’ असतो, पण जुने गिझर असल्यास ते वेगळे लावावे.
3. सोलर वॉटर हीटरचा पर्याय
जिथे शक्य आहे तिथे सोलर वॉटर हीटर वापरण्याचा विचार करा. उन्हाळ्यात सौर उर्जेचा फायदा होतोच.
4. गिझरची नियमित तपासणी
तांत्रिक अडचणी लक्षात येण्यासाठी गिझरचं वेळोवेळी सर्व्हिसिंग आवश्यक आहे. कमीत कमी वर्षातून एकदा तरी तज्ञाकडून तपासणी करून घ्या.
जागरूक राहा, सुरक्षित राहा!
गिझर ही आपल्या दैनंदिन गरजेची वस्तू असली, तरी तिचा वापर काळजीपूर्वक करणे आवश्यक आहे. उन्हाळ्यात गिझर बंद ठेवणं ही एक छोटी पावले असली, तरी ती मोठ्या अपघातापासून आपल्याला वाचवू शकते.
उन्हाळ्यात गिझर बंद ठेवणं ही फक्त वीजबचतीची गोष्ट नाही, ती तुमच्या आणि तुमच्या कुटुंबाच्या सुरक्षिततेशी जोडलेली आहे. त्यामुळे उन्हाळा सुरू झाला की, गिझरकडे दुर्लक्ष न करता त्याचा वापर अगदी गरज असेल तितकाच करा – तेही काळजीपूर्वक!