महिलांचा ‘चूल बंद’ संकल्प; भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन
सांगली । फार्णेवाडी-बोरगाव (ता. वाळवा) येथे श्री दत्त मंदिर येथे प्रतिवर्षीप्रमाणे श्री स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त तीन दिवसीय पारायण आणि धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. विशेष म्हणजे, गावातील महिलांनी ‘चूल बंद’ संकल्प करत एकत्र येऊन भाविकांसाठी महाप्रसादाची व्यवस्था केली.
भर उन्हात महिलांनी समर्पित भावनेने चपाती, १०० लिटर दूधाची शेवयाची खीर, कुर्मा आणि भात यांसारखे पारंपरिक पदार्थ तयार केले. या महाप्रसादाचा परीसरातील भाविकांनी मोठ्या भक्तिभावाने लाभ घेतला.
महिलांच्या या सामूहिक उपक्रमाचे गावात आणि परिसरात मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे. स्वामी समर्थ यांच्या चरणी समर्पित हा सोहळा श्रद्धाळू भाविकांसाठी विशेष आनंदाचा ठरला.

Recent Posts
बातमी शेअर करा : थंडीचा एखादा झोत अंगावरून गेला की आपले शरीर थरथरते आणि काही तरी गरम गरम हवेसे वाटायला लागते. परंतु गरम कपड्यांनी फार काही साध्य होत नाही. शेवटी गरम कपडे हा बाहेर... Read more










































































