Last Updated on 23 Oct 2021 2:45 PM by Sanjay Patil/Adhorekhit
नवी दिल्ली :
देशाने कोरोना लसीकरणाचा 100 कोटींचा टप्पा पार केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरील डिपी बदलला आहे. आपल्या फोटोद्वारे पंतप्रधानांनी देशवासीयांचे 100 कोटी लसी घेतल्याबद्दल अभिनंदन केले आहे. आपल्या राष्ट्रध्वजाचे रंग तिरंगादेखील फोटोमध्ये आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात 100 कोटी लसीकरणाच्या आनंदात, फेसबुक आणि ट्विटरवरील त्यांचे डीपी बदलले आहेत.त्याचबरोबर फोनवर ऐकली जाणारी कोरोनासंदर्भातील कॉलर ट्यून आता बदलली आहे.
देशाने २१ ऑक्टोबर २०२१ रोजी कोरोना लसीकरणाचा १०० कोटींचा टप्पा पार करून विक्रम केला आहे. देशातील सर्व नेत्यांनी या ऐतिहासिक विक्रमासाठी देशाचे अभिनंदन केले आहे.
तुमच्या मोबाईलमध्ये प्ले होणारी कॉलर ट्यून देखील लसीकरणाच्या विक्रमानंतर बदलली आहे. आता जर तुम्ही फोन केला तर तुम्हाला लसीकरण मोहिमेचा यशस्वी संदेश ऐकायला मिळेल. हे लक्षात घेण्यासारखे आहे की जेव्हापासून देशात कोरोना महामारीने आली, तेव्हापासून मोबाइल फोन वापरकर्त्यांना कोरोना महामारीबाबत सतर्क करण्यासाठी कॉलर ट्यून ऐकायला जात होती.










































































