मुंबई : राज्य विधानपरिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी भाजपाच्या केंद्रीय निवडणूक समितीनं 3 उमेदवारांची नावं जाहीर केली आहेत. संदीप जोशी, संजय केनेकर आणि दादाराव केचे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
विधानपरिषदेच्या 5 जागांसाठी येत्या 27 मार्चला पोटनिवडणूक होणार आहे. त्यातल्या सार्वधिक 3 जागा भाजपा लढवत असून, उरलेल्या 2 जागा शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस लढवणार हे, अद्याप त्यांचे उमेदवार जाहीर झालेले नाही. अर्ज भरण्याची अंतिम तारीख 17 मार्च आहे.