Last Updated on 06 Mar 2025 1:25 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली : सांगली जिल्ह्यातील सर्व दुय्यम निबंधक कार्यालयाची वेळ दि. 31 मार्च 2025 अखेर पर्यत कार्यालयीन वेळ म्हणजे सुट्टीचे दिवस वगळून दोन तासांनी वाढविण्यात येत असून हि दररोज सकाळी ८.४५ वाजल्यापासून ते संध्याकाळी ७.१५ वाजेपर्यंत राहील. याप्रमाणे या कालावधीमध्ये जिल्ह्यातील सर्व सह दुय्यम निबंधक, दुय्यम निबंधक कार्यालये चालू ठेवून दस्त नोंदणीचे सर्व प्रकारचे कामकाज सुरु ठेवण्यात येत आहे. या संधीचा जास्तीत जास्त नागरीकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन सह जिल्हा निबंधक वर्ग 1 तथा मुद्रांक जिल्हाधिकारी अश्विनी सोनवणे-जिरंगे यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे.
सन २०२४-२५ हे आर्थिक वर्ष संपत येत असल्याने माहे मार्च २०२५ मध्ये दस्त नोंदणीचे प्रमाण वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. यास्तव नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी दि. 1 मार्च 2025 ते दि. 31 मार्च 2025 या कालावधीत जिल्ह्यातील सर्व दुय्यम निबंधक कार्यालयाची वेळ दररोज दोन तासांनी वाढविली असल्याचे प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.
Recent Posts
बातमी शेअर करा :Last Updated on 14 Dec 2025 11:27 PM by Sanjay Patil/Adhorekhit 🔸कोणत्या राशीसाठी संधी, कोणासाठी सावधगिरी, जाणून घ्या 🔸आठवड्याची सुरुवात कशी करावी? ग्रह काय सुचवतात 🔸शुभ दिवस, रंग आणि उपाया... Read more













































































