नवी मुंबई : राज्यातील अंगणवाडी केंद्रातील ५ हजार ६३९ अंगणवाडी सेविका आणि १३ हजार २४३ अंगणवाडी मदतनीस अशी सर्व रिक्त पदे रिक्त आहेत. ही रिक्त पदे आयुक्तालय स्तरावरून भरण्यात येणार असून इच्छूकांनी मोठ्या संख्येने अर्ज करावेत, असे आवाहन एकात्मिक बाल विकास सेवा योजना नवी मुंबईचे आयुक्त कैलास पगारे यांनी केलं आहे.
नवी मुंबईतल्या बेलापूर इथल्या रायगड भवन इथल्या एकात्मिक बालविकास योजनेच्या कार्यालयात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. केंद्र सरकार पुरस्कृत एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्यातील ३६ जिल्हयांमध्ये एकूण ५५३ बाल विकास प्रकल्प कार्यरत आहेत. यापैकी ४४९ प्रकल्प ग्रामीण क्षेत्रात, ८६ प्रकल्प आदिवासी क्षेत्रात व १०४ प्रकल्प नागरी क्षेत्रात कार्यरत आहेत. या सर्व प्रकल्पाअंतर्गत राज्यात एकूण १ लाख १० हजार ५९१ अंगणवाडी केंद्र कार्यरत आहेत. या सर्व अंगणवाडी केंद्रातील ५ हजार ६३९ अंगणवाडी सेविका आणि 13 हजार 243 अंगणवाडी मदतनिस सर्व रिक्त पदे आयुक्तालय स्तरावरून भरण्यात येणार आहेत.
सर्व रिक्त पदे भरण्याबाबत वेळापत्रक निश्चित करण्यात आले आहे. अंगणवाडी सेविका व मदतनिस यांची सर्व रिक्त पदे ३१ मार्चपूर्वी भरण्यात येतील. राज्यातील बाल विकास प्रकल्प क्षेत्रातील इयत्ता बारावी उत्तीर्ण असलेल्या महिला उमेदवारांनी त्यांच्या निवासी क्षेत्रातील बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालयामार्फत प्रसिद्ध झालेल्या जाहिराती नुसार अंगणवाडी सेविका व मदतनिस या पदाकरीता अर्ज करावेत असे आवाहनही यावेळी आयुक्त पगारे यांनी केले.
Courtesy: Prasar Bharati
अंगणवाडी सेविका व मदतनीस पदासाठी अर्हता
अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस या पदासाठी स्थानिक रहिवासी असणे आवश्यक आहे. वयोमर्यादा किमान 18 ते कमाल 35 वर्षाच्या आतील असावे तसेच विधवा महिलासाठी क्योमर्यादा 40 वर्षांच्या आत असावे. अर्जदारास 2 अपत्यापेक्षा जास्त नसावे. 2 पेक्षा जास्त अपत्य होवू देणार नाही, असे प्रतिज्ञापत्रक सादर करावे. अर्जदार महिला असावी व समक्ष त्यांनीच अर्ज कार्यालयात सादर करावा स्थानिक रहिवासी ग्रामसेवक, तलाठी याचा दाखला असावा.
शैक्षणिक पात्रता मतदनीससाठी कमीत कमी 12 वी पास व त्यापुढील शिक्षण असावे. अर्ज नमून्यातील असावा (ग्रामपंचायत कार्यालयात उपलब्ध), जातीचा दाखला, पदवी, पदवीत्तर, शिक्षणशास्त्र पदविका, बीएड शासकीय मान्यता संस्थेचे संगणक परिक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र व मार्कशिट असल्यास जोडण्यात यावे, अंगणवाडी सेविका, मदतनीसवा बाल विकास प्रकल्प अधिकारी यांचा दोन वर्षांपेक्षा जास्त कालावधीचा अनुभव असल्यास ते जोडण्यात यावे. मोक्षणिक पात्रते संबंधित व अर्जासोबत जोडलेले सर्व प्रमाणपत्र साक्षांकीत केलेले नसल्यास ते ग्राहय धरण्यात येणार नाही तसेच त्या प्रमाणपत्रास गुणदान करता येणार नाहीं याची नोंद घ्यावी.