सांगली । वाळवा तालुक्यातील दुधारी येथील पाझर तलाव दुरुस्ती,नवीन वसाहतीतील गटार काम व पानंद रस्त्याचे मुरमीकरणं आदी ३५ लाखांच्या विकासकामांचा शुभारंभ माजी मंत्री आ.जयंत पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. महानंदचे माजी अध्यक्ष विनायक पाटील,माजी पं.स.सदस्या रुपाली सपाटे,युवक राष्ट्रवादीचे तालुका कार्याध्यक्ष देवराज देशमुख,सरपंच नागेश कदम,उप सरपंच सागर पाटील,जीवन कदम प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी नागेश कदम म्हणाले, दुधारी गावाच्या विकासात माजी मंत्री आ.जयंतराव पाटील यांचा सिंहाचा वाटा आहे. आम्ही गावाच्या विकासासाठी जे-जे मागू ते-ते त्यांनी तात्काळ दिले आहे. याप्रसंगी त्यांनी गावा तील उर्वरित विकास कामांना निधी मिळावा, अशी मागणी आ.पाटील यांच्याकडे केली. यावेळी युवा अभियंता प्रमोद पवार यांनी गावातील विकास कामाबद्दल आ.पाटील यांच्याशी सविस्तर चर्चा केली.
यावेळी ऊस भूषण विजेते अमोल लकेसर,सेवा सोसायटीचे माजी अध्यक्ष मोहन लकेसर,आनंदराव कदम,विश्वास पाटील, तंटामुक्तीचे अध्यक्ष शामराव पाटील, ताकारी- दुधारी सेवा सोसायटीचे उपाध्यक्ष सुनिल पवार,ग्रामपंचायत सदस्य शाहरुख मुजावर, मंगल सावंत,युवक राष्ट्रवादी चे अध्यक्ष अक्षय कदम,सलीम पटवेगार,सागर पाटोळे, सुहास पाटील,राहुल थोरात,अमोल पवार, किरण बाबर यांच्यासह गावातील प्रमुख कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.