मुंबई । मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत अपात्र ठरलेल्या कोणत्याही बहिणींचे पैसे सरकारनं परत घेतलेले नाहीत किंवा पैसे परत घेण्यासंदर्भात सरकारनं कोणताही निर्णय घेतला नाही, असं महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी स्पष्ट केलं आहे.
त्या आज मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होत्या. थेट हस्तांतरणाचा लाभ देणाऱ्या इतर योजनांप्रमाणेचं याही योजनेचं मूल्यमापन केलं जात असल्याचं त्यांनी सांगितलं. ही योजना नवीन असल्यामुळे, त्याबद्दल संभ्रम निर्माण केला जात आहे असंही त्यांनी म्हटलं. सध्या ज्या महिला पुढे येऊन आपले अर्ज मागे घेऊ इच्छित आहेत ते सर्व ऐच्छिक आहे. आत्तापर्यंत सुमारे साडे तीन ते चार हजार महिलांनी विभागाकडे निवेदन दिलं असल्याचं तटकरे यांनी सांगितलं. २६ जानेवारीच्या पूर्वी, लाडकी बहीण योजनेचा पुढील हप्ता, बहिणींच्या खात्यात जमा होईल, असा पुनरूच्चार तटकरे यांनी यावेळी केला.