सांगली । वाळवा तालुका राष्ट्रीय साखर कामगार संघ (इंटक) च्या अध्यक्षपदी राजेंद्र बाबुराव चव्हाण (नवेखेड),तर जनरल सेक्रेटरीपदी शंकरराव रामचंद्र भोसले (कासेगाव) यांची एकमताने फेरनिवड करण्यात आली आहे. माजी मंत्री आ.जयंत पाटील, राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रतीक पाटील, कार्यकारी संचालक आर. डी.माहुली यांनी नूतन अध्यक्ष-जनरल सेक्रेटरी यांच्यासह नव्या कार्यकारिणीचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.
नूतन पदाधिकारी व सदस्यांनी स्व.बापूंच्या पुतळ्या स पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
नूतन कार्यकारिणी- उपाध्यक्ष-विकास विष्णू पवार (कुंडल),सुदाम भगवान पाटील (जुनेखेड),मोहनराव आनंदराव शिंदे (आष्टा), कार्याध्यक्ष-तानाजीराव रंगराव खराडे (कापुसखेड),सहचिटणीस-संजय गोविंद शेळके (कासेगाव),योगेश वसंतराव पवार (बागणी),खजिनदार-सचिन भीमराव कोकाटे (मालेवाडी),सदस्य-बाबासो नगारे,कृष्णा चव्हाण,अण्णा नाईक,दत्तात्रय पाटील,अमोल पाटील,चंद्रकांत पाटील,प्रदीप कदम,प्रताप पाटील,सखाराम बुधावले,प्रितम जाधव,संपत कोळेकर,सुनील लोंढे,कैलास चव्हाण,विकास पाटील,उल्हास निंबाळकर.
नूतन अध्यक्ष राजेंद्र चव्हाण म्हणाले, राज्यातील साखर कामगारांचे नेते शंकरराव भोसले यांच्या मार्गदर्शना खाली मला पुन्हा अध्यक्ष म्हणून कामाची संधी मिळाली आहे. मी सर्वांचा ऋणी आहे. मी जेष्ठ मार्गदर्शक व युवा सहकाऱ्यांना बरोबर घेऊन तालुक्यातील साखर कामगारांचे प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न करेन.