सांगली : कासेगाव (ता वाळवा) येथील जल संधारण विभागातील सेवानिवृत्त व्यवस्थापक दिनकर मारुती शेळके (वय ८३ वर्षे) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात विवाहित दोन मुलगे,एक मुलगी,सुना, नातवंडे,भाऊ-भावजयी,पुतणे असा मोठा परिवार आहे. रक्षा विसर्जन व कार्यविधी बुधवार दि.१५ जानेवारी २०२५ रोजी कासेगाव येथे होणार आहे. वैद्य मापन शास्त्र विभागाचे सहाय्यक आयुक्त प्रदीप शेळके व उपजिल्हा रुग्णालयाचे डॉ.शहाजी शेळके यांचे ते वडील होत.