नवी दिल्ली । महाराष्ट्र आणि झारखंडमधील विधानसभा निवडणुकीसाठी प्रचार जोरात सुरू आहे. विविध राजकीय पक्षांचे वरिष्ठ नेते त्यांच्या उमेदवारांना पाठिंबा मिळवण्यासाठी दोन्ही राज्यांमध्ये अनेक प्रचारसभा घेत आहेत. पंतप्रधान आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते नरेंद्र मोदी आज महाराष्ट्रातील अकोला आणि नांदेड इथं जाहीर सभांना संबोधित करणार आहेत. काल मोदी यांच्या धुळे आणि नाशिक इथं, तर अमित शहा यांच्या काल सांगली जिल्ह्यातील शिराळा, सातारा जिल्ह्यात दक्षिण कराड इथं सभा झाल्या.
झारखंडमध्ये दुसऱ्या टप्प्यातील मतदान 20 नोव्हेंबरला होणार आहे, त्यामुळं तिथं प्रचार संपायला अवघे तीन दिवस उरले आहेत. झारखंडमध्ये आज केंद्रीय गृहमंत्री आणि भाजप नेते अमित शहा आज झारखंडच्या जमशेदपूरमधील छत्रपूर, हजारीबाग आणि पोटका विधानसभा मतदारसंघात जाहीर सभांना संबोधित करणार आहेत. लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस नेते राहुल गांधी आज धनबाद जिल्ह्यातील बागमारा विधानसभा मतदारसंघ आणि पूर्व सिंहभूम जिल्ह्यातील जमशेदपूर इथं निवडणूक सभेला उपस्थित राहणार आहेत. झारखंड मुक्ती मोर्चाचे ज्येष्ठ नेते आणि मुख्यमंत्री हेमंत सोरेन रांची, खरसावा आणि मंदार मतदारसंघात अनेक सभांना संबोधित करणार आहेत, तर राजद, एजेएसयू आणि डाव्या पक्षांचे नेते राज्याच्या विविध भागांमध्ये निवडणूक सभांना संबोधित करतील.
साभार : प्रसार भारती