खोटं सिद्ध करणाऱ्यास ५ तोळे सोने, चारचाकी, रोख १ लाख आणि हत्तीवर बसवून मिरवणूक
सांगली । ‘स्वाभिमानी’ शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी ऊस दराबाबत साखर सम्राटांना खुले आव्हान दिले आहे. जिल्हयातील सर्व साखर कारखान्याचे चेअरमन, व्हा. चेअरमन व संचालकांनी हिम्मत असेल तर या आणि बंपर बक्षिस जिंका असे जाहीर आव्हान दिले असून टनाला ४ हजार रुपये देऊ शकतो हे खोटं सिद्ध करा. सिद्ध करणाऱ्यास ५ तोळे सोने, चारचाकी, रोख १ लाख देऊ आणि हत्तीवर बसवून मिरवणूक काढण्यात येईल; अशा आशयाची डिजिटल इस्लामपूर शहरात झळकली आहेत. ही डिजिटल शहरवासीयांचे लक्ष वेधून घेत आहेत.
‘स्वाभिमानी’ च्या कार्यकर्त्यांनी इस्लामपूर शहरातील उदय चौक व बसस्थानक परिसरात ही डिजिटल लावली आली आहेत. यामध्ये १ टन उसाला कसा ४ हजार दर देता येतो याचा सविस्तर लेखाजोखाच मांडला आहे. १ टन उसापासून किती साखर तयार होते. इथेनॉलपासून किती उत्पन्न मिळते, बगॅसपासूनचे उत्पन्न यासह त्यावर होणारा खर्च याची मांडणी करण्यात आली आहे.
१ टन उसाला ४ हजार रुपये दर देता येतो हे गणित सप्रमाण मांडण्यात आले आहे. टनाला ४ हजार देऊ शकतो हे खोटं सिद्ध करा असे आव्हानच देण्यात आले आहे. सिद्ध करणाऱ्यास ५ तोळे सोने, चारचाकी, रोख १ लाख देऊ आणि हत्तीवर बसवून मिरवणूक काढण्यात येईल… त्याचबरोबर आणखीही काही मुद्दे उपस्थित करण्यात आले आहेत.
साखर कारखानदार ऊस उत्पादक शेतकऱ्यांची लूट करीत आहेत.साखरेचा खुल्या बाजारातील दर वाढलेला असतो. उपपदार्थ निमिर्तीमधूनही चांगला फायदा होत आहे. तरीही वाढीव दर देताना कारखानदार एक होऊन ऊस उत्पादकांना फसवतात.पण, टनाला ४ हजार रुपये दर देणे शक्य आहे. टनाला ४ हजार देऊ शकतो हे खोटं सिद्ध करा. सिद्ध करणाऱ्यास ५ तोळे सोने, चारचाकी, रोख १ लाख देऊ आणि हत्तीवर बसवून मिरवणूक काढण्यात येईल.
दिलीप पवार, कार्यकर्ते,
स्वाभिमानी शेतकरी संघटना
साखर कारखानदारांना टनाला ४ हजार दर देणे शक्य आहे. साखर कारखानदार ऊस उत्पादकांची अडवणूक करत आहेत. कारखानदारांनी टनाला ४ हजार रुपये देऊ शकतो हे खोटं आहे सिद्ध करावे.
भागवत जाधव
स्वाभिमानी शेतकरी संघटना
शहरात अशी डिजिटल झळकली आहेत…