सांगली । राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष,माजी मंत्री आ.जयंत पाटील यांनी गेल्या ३५-४० वर्षापासून वाळवा तालुका व या मतदारसंघा चा कुटुंबाप्रमाणे सांभाळ करून तो राज्यात सातत्याने अग्रेसर ठेवण्याचे काम केलेले आहे. त्यामुळे कोण काय म्हणते? याकडे फारसे लक्ष देण्याची गरज नाही. आपणा सर्वांच्या ताकदीवर हा मतदारसंघ अभेद्य होता व राहील,असा विश्वास राजारामबापू सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष,युवा नेते प्रतीक पाटील यांनी बागणी,बावची व गोटखिंडी येथील विकास कामांच्या भूमिपूजन व उदघाटन समारंभात बोलताना व्यक्त केला.
श्री.पाटील यांच्या हस्ते बागणी येथे ६ कोटी ५ लाखाची ४ कामे,बावची येथे ६ कोटी ७९ लाखाची ३ कामे व गोटखिंडी येथे ७२ लाखाच्या ४ विकासकामांचे भूमिपूजन व उदघाटन करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसचे विजयराव पाटील,बाळासाहेब पाटील, संजयराव पाटील,संग्राम जाधव,देवराज देशमुख त्यांच्या समवेत होते. राजारामबापू सह.बँकेचे उपाध्यक्ष विजयराव यादव, कारखाना संचालक वैभव वसंतराव रकटे, सरपंच कविता अनुसे,उपसरपंच कुंदन कोकाटे,बागणी सरपंच तृप्ती हवलदार,माजी सभापती अल्लाउद्दीन चौगुले,माजी संचालक भगवान पाटील,सुभाष हवलदार,राजेंद्र पवार, विलासराव माळी,गोटखिंडी सरपंच दीपाली पाटील,दूध संघाचे संचालक धैर्यशील थोरात, उपसरपंच प्रतापसिंह थोरात,सागर डवंग, विजयराव लोंढे,राजेंद्र पाटील प्रामुख्याने उपस्थित होते.
बागणी येथे मुख्यमंत्री सडक योजनेतून ५ कोटी ५३ लाखाच्या गणेश पाणंद रस्त्याच्या सुधारणा कामाचे भूमिपूजन,स्वामी समर्थ मदिरासमोर आमदार फंडातून २ लाखाच्या फेव्हिंग कामाचे उदघाटन,चांदोली वसाहत २५१५ योजनेतून ३५ लाखांच्या रस्ता डांबरीकरण कामाचे भूमिपूजन, पांढर मळा येथील विशेष रस्ते दुरुस्ती अंतर्गत १५ लाख रुपयांच्या रस्ता डांबरीकरण कामाचे भूमिपूजन,बावची येथे विशेष रस्ते दुरुस्ती अंतर्गत माळी-पाटील वस्तीकडे जाणारा रस्ता सुधारणे ३० लाख,मुख्यमंत्री ग्रामसडक योजने अंतर्गत बावची-फाळकेवाडी-बागणी रस्ता सुधारणे ६ कोटी ३६ लाख,आमदार फंडातून नागठाणे रस्ता सुधारणा १३ लाख, गोटखिंडी रामोशी वस्ती ते लोणारवाडी विशेष रस्ते सुधारणा मधून ३० लाख,गौण खनिज रामोशी वस्ती विहीर संरक्षण भिंत ७ लाख, २५१५ मधून स्मशानभूमी रस्ता सुधारणा २० लाख,गौण खनिज अंतर्गत आर.सी.गटार, मुख्य रस्ता १५ लाख आदी विकास कामांचे भूमिपूजन व उदघाटन करण्यात आले.
बागणीचे अल्लाउद्दीन चौगुले,राजेंद्र पवार,सुभाष हवलदार,विलास माळी,माजी उपसरपंच विष्णू किरतसिंग,डी. आर.पाटील, सतिश काईत,दिनकर पाटील,जावेद चौगुले, किसन मलप,बावची येथे बाळासाहेब कोकाटे,काकासो कोकाटे,लालासाहेब अनुसे, बाबूराव कामेरीकर,बाळासो देसाई,सारंग भोसले,अनिल शिंगारे,नितीन पाटील, जयकर अनुसे,जालिंदर यादव,संभाजी पाटील, गोटखिंडी येथे एन.जी.पाटील,रमेश पाटील, राजश्री पडळकर,आशा कुलकर्णी,प्रकाश एटम,भानुदास पाटील,हणमंत पाटील, अविनाश डवंग,मोहन करांडे,अर्जुन करांडे, शुभम पाटील,दिलीप पाटील,बंडू आडके, प्रकाश जाधव,अविनाश पाटील,बाबासो ढवळे यांच्यासह ग्रा.प.सदस्य,विविध संस्थांचे पदाधिकारी,कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.