विविध विकासकामांसाठी १ कोटी १२ लाख रुपयांचा भरीव निधी
सांगली । राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष माजी मंत्री आ.जयंत पाटील यांनी सातत्याने बोरगाव गावाच्या सर्वांगिण विकासाला मोठी चालना दिली आहे. यावेळी त्यांच्या विशेष प्रयत्नातून गावातील विविध विकासकामांसाठी १ कोटी १२ लाख रुपयांचा भरीव निधी मिळाला आहे. आपण या निधीतून गावात दर्जेदार विकासकामे करून गावाच्या विकासा ला अधिक चालना देऊया,असे आवाहन राजारामबापू सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष,युवा नेते प्रतीक पाटील यांनी केले. यावेळी प्रतीक पाटील यांचे तुतारी च्या निनादात जोरदार स्वागत करण्यात आले.
बोरगाव (ता.वाळवा) येथील विविध विकास कामांच्या भूमिपूजन व उदघाटन प्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष विजयराव पाटील,युवा नेते अभिजित माणिकराव पाटील,राजारामबापू साखर कारखान्याचे संचालक कार्तिक पाटील, राजारामबापू बँकेचे संचालक माणिक पाटील,राजारामबापू दूध संघाचे संचालक धैर्यशील पाटील,जेष्ठ नेते शामराव वाटेगावकर,कृष्णेचे माजी संचालक उदय शिंदे,शिवाजी वाटेगावकर,उपसरपंच राजेंद्र वाटेगावकर,युवक राष्ट्रवादीचे तालुका कार्याध्यक्ष देवराज देशमुख प्रामुख्याने उपस्थित होते.
प्रतीक पाटील म्हणाले,आ.जयंत पाटील यांनी गावाच्या विकासाबरोबर आपल्या गावातील धरणग्रस्त वसाहतींच्या विकासालाही चालना दिली आहे. यावेळी निवळी वसाहतीतील रस्ता कॉक्रीटीकरणास रुपये ३५ लाख,तर खुंदलापूर वसाहतीतील रस्ता काँक्रीटीकरणास रुपये २० लाखाचा निधी दिला आहे. तसेच गावातील ३ रस्त्यां च्या काँक्रीटीकरणास अनुक्रमे रुपये २५ लाख,रुपये २० लाख व रुपये १० लाखाचा निधी दिला आहे. यावेळी ब्रह्मनंद महाराज मठातील पेव्हिंग ब्लॉकच्या कामाचे उदघाटन ही करण्यात आले.
पै.विनायक पाटील,पै.विकास पाटील, पै.विलास शिंदे,लालासाहेब वाटेगावकर, डी.आर.सलगर,युवराज कांबळे,सचिन पाटील,प्रकाश वाटेगावकर,सचिन सलगर, अभिजित शिंदे, सचिन देसाई,गणेश पाटील, प्रदीप पाटील, सविता पाटील,वंदना चाचे, सुखदेव महाराज गिरीगोसावी,पंढरीनाथ कोळेकर,धरणग्रस्तांचे कार्यकर्ते रामचंद्र सोनवणे,तानाजी सावंत,शामराव सावंत, विठ्ठल सावंत,मारुती सोनवणे यांच्यासह कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.