Last Updated on 23 Sep 2024 9:30 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली । माजी जेष्ठ मंत्री दीनदयाळ मागासवर्गीय सहकारी सूतगिरणीचे संस्थापक, मार्गदर्शक डॉ. अण्णासाहेब डांगे यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या इस्लामपूर येथील दीनदयाळ मागासवर्गीय सहकारी सूतगिरणी मर्यादित इस्लामपूर या सूतगिरणीची वार्षिक साधारण सभा बुधवार, दिनांक २५ सप्टेंबर रोजी दुपारी १ वाजता सूतगिरणीच्या कार्यस्थळावर आयोजित करण्यात आली असल्याची माहिती सुत गिरणीचे एक्झिक्यूटिव्ह डायरेक्टर अॅड. राजेंद्र उर्फ चिमण डांगे यांनी दिली
या वार्षिक साधारण सभेस प्रमुख मार्गदर्शक म्हणून महाराष्ट्राचे माजी जेष्ठ मंत्री व सूतगिरणीचे संस्थापक डॉ. अण्णासाहेब डांगे हे उपस्थित राहणार आहेत. वार्षिक साधारण सभा सूतगिरणीचे चेअरमन अमोल आनंदराव चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली होणार असून सभासदांची सभेसाठी सुतगिरणी कार्यस्थळावर येणे जाण्याची व्यवस्था वाळवा पंचायत समिती इस्लामपूर, बस स्थानक जवळून करण्यात आली आहे. या सभेस सर्व सभासद बंधू भगिनी यांनी उपस्थित रहावे असे आवाहन सूतगिरणीच्या वतीने एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर अॅड. राजेंद्र उर्फ चिमण डांगे यांनी केले आहे.












































































