सुरक्षेच्या दृष्टीने आज सर्वांच्या घरी सीसीटीव्ही कॅमेरे गरजेचे झाले आहे. ज्या घरी लहान मुले किंवा ज्येष्ठ नागरिक आहेत अशा घरी तर सीसीटीव्ही कॅमेरे लावायलाच हवे.
सीसीटीव्ही म्हणजेच क्लोज सर्किट कॅमेऱ्याच्या मदतीने आपण आपल्या घरांवर दुरून नजर ठेवू शकतो. सध्या बाजारात अनेक ब्रँडचे सीसीटीव्ही कॅमेरे उपलब्ध आहेत. असे असताना आपल्या घरासाठी कुठला कॅमेरा फायदेशीर ठरेल.
हल्ली मोबाईल फोन घेताना सर्वप्रथम आपण मोबाईल फोनचा कॅमेरा किती एम पी चा आहे हाच प्रश्न विचारतो तर सीसीटीव्ही खरेदी करताना कॅमेऱ्याची गुणवत्ता ही बघायलाच हवी. लक्षात ठेवा की सीसीटीव्ही खरेदी करताना त्यात चा कॅमेरा नक्की बघवा कमी मेगापिक्सेल सेन्सरमुळे चित्राची गुणवत्ता खराब होऊ शकते. अशा परिस्थितीत दूर राहणाऱ्या व्यक्तीचा चेहरा स्पष्टपणे दिसणार नाही. आपण 8MP कॅमेरा सेन्सर असलेले CCTV खरेदी करू शकता.
आजकाल बाजारात येणाऱ्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये नाईट व्हिजन फीचर उपलब्ध आहे. नाईट व्हिजन असल्यामुळे सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमुळे अंधारातही चांगली छायाचित्रे टिपता येतील आणि घराभोवतीची सुरक्षा अधिक चांगली राहील. तर 360 डिग्री मोशन व्ह्यू असलेला सीसीटीव्ही कॅमेरा खरेदी करणे फायदेशीर ठरू शकते.
जर तुम्ही तुमच्या घर किंवा ऑफिससाठी नवीन सिक्योरिटी कॅमेरा खरेदी करण्याची प्लॅनिंग करत असाल तर काही गोष्टींची काळजी नक्की घ्या. आज आम्ही या आर्टिकलमध्ये तुम्हाला काही अश्या आवश्यक गोष्टींची माहिती देणार आहोत ज्यांचा विचार तुम्ही नवीन सीसीटीव्ही कॅमेरा खरेदी करताना अवश्य केला पाहिजे. या गोष्टींची काळजी घेऊन तुम्ही तुमच्यासाठी एक एक बेस्ट CCTV Camera खरेदी करू शकता.
हेही वाचा – विहिरी, शेततळे, वीज जोडणीसाठीच्या अनुदानात वाढ; ‘या’ योजनेच्या निकषांमध्ये सुधारणा
या गोष्टींची घ्या काळजी
CCTV कॅमेरा रेंज – सीसीटीव्ही कॅमेरा खरेदी करताना त्या कॅमेऱ्याची रेंज किती आहे हे चेक करणं खूप आवश्यक आहे. एका सामान्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात 20 ते 25 मीटर पर्यंतची रेंज मिळते. जितकी जास्त रेंज तुमच्या कॅमेऱ्यात असेल, तितकी जास्त दूरवरची फुटेज तुम्ही याच्या माध्यमातून कॅप्चर करू शकता.
CCTV कॅमेरा रिजोल्यूशन – चांगल्या क्वॉलिटीची फुटेज कॅप्चर करण्यासाठी तुम्हाला चांगलं रिजोल्यूशन असलेला सीसीटीव्ही कॅमेरा घ्यावा लागेल. मार्केटमध्ये तुम्हाला 720p आणि 1080p रिजोल्यूशन व्हिडीओ कॅप्चर करणारे सीसीटीव्ही कॅमेरा चांगल्या किंमतीत मिळतील.
CCTV कॅमेरा स्टोरेज – कॅमेऱ्याची स्टोरेज देखील एक आवश्यक फॅक्टर आहे. बाजारात तुम्हाला 32 जीबी पासून 256 जीबी पर्यंतचे स्टोरेज असलेले सीसीटीव्ही कॅमेरे खरेदीसाठी उपलब्ध होतील. जितकी जास्त स्टोरेज असलेला कॅमेरा तुम्ही खरेदी कराल तितकी जास्त फुटेज स्टोर होईल.
वॉटरप्रूफ – जर तुम्ही घराबाहेरची फुटेज रेकॉर्ड करण्यासाठी सीसीटीव्ही खरेदी करू इच्छित असाल तर वॉटरप्रूफ सीसीटीव्ही कॅमेरा तुमच्यासाठी बेस्ट आहे. या क्वॉलिटीमुळे कॅमेरा पावसात देखील काम करतो.
नाइट व्हिजन- सीसीटीव्ही कॅमेरा खरेदी करताना नाइट व्हिजन क्वॉलिटीची देखील काळजी घ्या. नाइट व्हिजनला सपोर्टसह सीसीटीव्ही कॅमेरा रात्रीच्या प्रकाशात देखील क्वॉलिटी असलेला व्हिडीओ रेकॉर्ड करतो.