Last Updated on 16 Sep 2024 5:09 PM by Sanjay Patil/Adhorekhit
कोंदनी वीज प्रकल्पात दोन बिबट्यांचा मुक्काम
अहमदनगर । जिल्हयातील अकोले तालक्यातील कोंदणी वीज निर्मिती प्रकल्पात सध्या दोन नर मादी बिबट्याने मुक्काम ठोकला आहे. त्यामुळे या वीज प्रकल्पात काम करणारे कर्मचारी भीतीने जीव मुठीत धरून वावरत आहेत. वन्य जीव विभागाने पिंजरा लावण्याची मागणी स्थानिक ग्रामस्थानी केली आहे .
चिंचवणे, बांगर वाडी,माळेगाव, कोंदणी परिसरात बिबट्यांचा वावर वाढला असून दुपारी तीन वाजता बिबटे राजरोस फिरत असून त्यांनी कोंबड्या, शेळ्या,बकऱ्या यांचा फडशा पडला असून कोंदनी वीज प्रकल्प ३४ मेगावॅट वीज प्रकल्प आहे.
यामुळे वीज केंद्राचा नियोजन बिघडले आहे .वीज प्रकल्पाच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात या दोन नर मादी बिबट्याचे चित्रण टिपण्यात आले असून गेली तीन वर्षांपासून हे बिबट्याने अधिवास केला आहे.











































































