Last Updated on 14 Sep 2024 7:58 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली । इस्लामपूर व आष्टा शहरासह वाळवा तालुक्यातील 155 सार्वजनिक गणेश मंडळांना भाजपाचे जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले-पाटील यांनी भेट देऊन गणरायाचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी गणरायाची आरती देखील केली.
चौदा विद्या आणि चौसष्ठ कलांचा अधिपती, बुद्धीची देवता असलेल्या लाडक्या बाप्पाचा उत्सव जगभर सुरू आहे. वाळवा तालुक्यातही या उत्सवाची धामधूम मोठ्या प्रमाणात सुरू आहे. भाजपाचे जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले-पाटील यांनी शुक्रवारी इस्लामपूर व आष्टा शहरासह वाळवा तालुक्यातील १५५ सार्वजनिक गणेश मंडळांना भेटी देऊन गणरायाचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी गणरायाची आरती देखील केली. तसेच त्यांनी मंडळाचे अध्यक्ष, सर्व सदस्यांना शुभेच्छा दिल्या. जागोजागी त्यांचा मंडळातर्फे महावस्त्र, सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी बोलताना निशिकांत भोसले-पाटील म्हणाले, गणेशोत्सवामुळे सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे. गणराया चरणी मी सर्व लोकांना, भक्तांना सौख्य आनंद आणि आरोग्य दायी जीवन लाभावे अशी प्रार्थना करतो. तसेच सर्व मंडळातील कार्यकर्त्यांना कोणतीही समस्या असल्यास मला वैयक्तिक फोन करण्याचे मी आवाहन करतो.

यावेळी उरुण ईश्वरपूरचा महाराजा कै.अविनाश पाटील (दादा) गणेश उत्सव मंडळाचे मार्गदर्शक व माजी उपनगराध्यक्ष जयवंत पाटील, सूरज पाटील, सतेज पाटील यांच्यासह खोलवाट गणेश मंडळ, श्री.सिध्देश्वर तरुण गणेश मंडळ, श्री.राजा शिवछत्रपती गणेश मंडळ, श्री.खंडेश्वर गणेश मंडळ, कै. स्व. एम.डी.पवार गणेश मंडळ, श्री.शिव छत्रपती बाल गणेश मंडळ पाटील गल्ली, श्री.सिद्धनाथ गणेश मंडळ, श्री.झुंझार गणेश मंडळ, श्री सुवर्णयुग तरुण मंडळ, श्री. शिवप्रेमी तरुण गणेश मंडळ, श्री.बिरोबा गणेश मंडळ, श्री.भीम गणेश मंडळ, श्री.लक्ष्मी गणेश मंडळ, श्री. त्रिमूर्ती गणेश मंडळ, श्री. शिवप्रतिष्ठान गणेश मंडळ, श्री.रेणुका तरुण गणेश मंडळांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, गणेश भक्त मोठया संख्येने उपस्थित होते.













































































