Last Updated on 15 Sep 2024 12:17 PM by Sanjay Patil/Adhorekhit
एसटीच्या बसेस आता लवकरच नव्या लुकमध्ये दिसणार आहेत. या बसची पहिली झलक समोर आली आहे. नव्या रुपातील लालपरी एसटी महामंडळाच्या ताफ्यात नव्याने 2 हजार 475 गाड्या दाखल होणार आहेत.

तामिळनाडूमधील तिरुचिरापल्ली येथे असलेल्या अशोक लेलँडच्या बस बांधणी कंपनीत या बस तयार होत आहेत. आगामी काळात येणाऱ्या 2475 साध्या बसेसपैकी पहिली प्रोटोटाइप बस तयार झाली आहे. एसटी महामंडळाच्या ताफ्यात साध्या डिझेल बसेसचा समावेश होणार आहे.

एसटी महामंडळाकडे सध्या 15 हजार बसेसचा ताफा आहे. परंतू या आधी एसटीकडे 18 बसेसचा ताफा होता. त्यामुळे नवीन 2475 बसेस ताफ्यात समाविष्ट करण्याची योजना आहे. नवीन बसेस डिझेलवर धावणाऱ्या असतील त्या टु बाय टु आसनी असणार आहेत.

एसटीच्या ताफ्यात नवीन बसचा समावेश ऑक्टोबर महिन्यापासून होण्याची शक्यता आहे. या बस टु बाय टू आसनी असून एका बसचा अंदाजित खर्च 38.26 लाख रुपये असणार आहे.

या बस आधुनिक असणार असून CMVR स्टँडर्डच्या असणार आहेत. या बसला 197 एचपी एच सिरिजचे इंजिन आहे. या बस रिअर एअर सस्पेन्शनसह अन्य सुविधा असलेल्या आहेत.

या बसेस अशोक लेलॅण्ड कंपीच्या प्लांटमध्ये बांधल्या जाणार आहेत. नव्या तंत्राने तसेच प्रवाशांची सुरक्षा पाहून राज्य परिवहन महामंडळाच्या गरजेनुरुप त्या बांधण्यात येणार आहे. अशोक लेलॅण्ड जगातील पाचवी सर्वात मोठी बस निर्मिती करणारी कंपनी असून भारताची सर्वात मोठी बस निर्माण करणारी कंपनी आहे.












































































