इस्लामपूर : हुबालवाडी (ता वाळवा) येथील महाराष्ट्र धनगर महासंघाचे प्रमुख पदाधिकारी, इस्लामपूर कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक, बहे सर्व सेवा सोसायटीचे विद्यमान संचालक विकास शामराव नांगरे (वय ५२) यांचे मंगळवारी आकस्मित निधन झाले.
त्यांचे पश्चात वडील, पत्नी, दोन मुले, दोन मुली, दोन पुतणे सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षा विसर्जन व उत्तर कार्य विधी शुक्रवार दि.६ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजता हुबालवाडी येथे आहे.
मनमिळावू व्यक्तिमत्व हरपले
लोकांसाठी झटणारा लोकप्रतिनिधी, सुसंस्कृत राजकारणाचा चेहरा तसेच राजकारण, समाजकारणातील एक सर्व समावेशक नेतृत्व हरपले आहे. त्यांनी सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी कायम पुढाकार घेतला. विकास नानांच्या रूपाने मनमिळावू आणि दिलदार लोकप्रतिनिधी आज आपल्यातून गेला. त्यांच्या जाण्याने परिसराची अपरिमित हानी झाली आहे. त्यांना ‘अधोरेखित’ परिवाराच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली!