महाराष्ट्र वनसेवा विभागात वनक्षेत्रपाल म्हणून निवड
सांगली : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षा -2019 चा निकाल जाहीर करण्यात आला असून यात इस्लामपूरच्या इंद्रजित अर्जुन पवारने यश मिळवले आहे.त्याची वनक्षेत्रपाल म्हणून नियुक्ती झाली आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे महसूल व वन विभागातील सहायक वन संरक्षक,गट- अ तसेच वनक्षेत्रपाल गट-ब या संवर्गातील 100 पदांसाठी घेण्यात आलेल्या महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षा -2019 चा निकाल जाहीर करण्यात आला आहे. इस्लामपूर येथील इंद्रजित पवार याने या परीक्षेत यश मिळवले असून त्याची वनक्षेत्रपाल म्हणून निवड झाली आहे.पुणे येथून केमिकलमधून अभियांत्रिकीची त्याने पदवी मिळवली आहे.त्याने दुसऱ्या प्रयत्नात हे यश मिळवले आहे.इस्लामपूर येथील विद्यामंदिर कनिष्ठ महाविद्यालयाचा तो माजी विद्यार्थी आहे.प्रसिध्द वकील अॅड.अर्जुन पवार यांचा तो मुलगा आहे.पदवीनंतर त्याने स्पर्धा परीक्षांचा अभ्यास सुरु केला होता.या यशाबद्दल त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.