Last Updated on 03 Aug 2024 7:03 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली । कामेरी (ता.वाळवा) येथील न्यू इंग्लिश स्कूलच्या शैक्षणिक संकुलात १९८८ बॅचच्या माजी विद्यार्थी व शिवाजी वाचनालयाच्या वतीने १५० वृक्ष लागवड करण्यात आली. याप्रसंगी छगनबापू गर्ल्स स्कूलच्या अध्यक्ष सौ जयश्री चंद्रकांत पाटील बोलत असताना १९८८ बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचे फार कौतुक केले.
यावेळी बोलताना जयश्री चंद्रकांत पाटील म्हणाल्या,निसर्ग मानवाला खूप काही देत असतो याची जाण ठेवून निसर्गाचे देणे आहे या कृतज्ञतेच्या भावनेतून प्रत्येक नागरिकांनी पर्यावरणाचा रक्षण व संवर्धन करण्यासाठी आपापल्या क्षेत्रात वृक्षारोपण करून एक तरी झाड लावले पाहिजे.
यावेळी माजी विद्यार्थ्यांनी इंग्लिश स्कूलच्या प्रांगणाच्या भोवती १५० वृक्षांची लागवड केली.त्याचबरोबर वृक्ष संगोपनाची जबाबदारी ही घेतली.
यावेळी कामेरीचे सरपंच रणजीत पाटील व उपसरपंच सूर्यकांत पाटील तसेच न्यू इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक पी एस कदम, गर्ल्स हायस्कूलचे मुख्याध्यापक एस.जी.गुरव,अनुराधा पेडणेकर,धनाजी पाटोळे व माजी विद्यार्थी व किर्लोस्कर कंपनी केनियाचे प्रमुख अधिकारी राजकुमार पाटील,अण्णासाहेब डांगे अभियांत्रिकी महाविद्यालयाचे केंद्रीय संगणक विभागाचे प्रमुख प्रा.अधिक जाधव,प्रा प्रताप पाटील,उपेंद्र जाधव,सुशील मेडिकलचे प्रशांत पाटील,विकास पाटील,जगदीश जाधव,नंदकुमार पाटील,उमेश पाटील,इरफान पठाण,अरविंद आढाव,प्रकाश पोचे,माणिक माने,राजेंद्र जेडगे,अरुण गायकवाड आदी उपस्थित होते.










































































