राज्यात मान्सून कालावधीत वीज पडणे /वज्राघात होणे याचे प्रमाणे अधिक असल्याने जिवित व वित्तहानी होत असते. ही एक नैसर्गिक आपत्ती असून जिवित हानी व वित्तीय हानी टाळण्याच्या दृष्टीने काय उपाययोजना करण्यात याव्यात याबाबत राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांनी राज्यासाठी मार्गदर्शक सूचना प्रसिध्द केल्या आहेत. नागरीकांनी अशा आपत्तीपासून बचाव करण्याच्या दृष्टीने काय करावे व काय करु नये याबाबतच्या जनजागृतीविषयक मार्गदर्शक सूचना तसेच राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांनी नागरी पूर आपत्ती प्रसंगी पूर्वतयारी व प्रतिबंधक उपाययोजनांबाबतही सूचना दिल्या आहेत.
👉 पूर परिस्थितीत घराबाहेर पडू नका
👉 शासनाच्या अधिकृत प्रसार माध्यमांद्वारे प्रसारित होणाऱ्या माहिती व सतर्कतेच्या सुचनांकडे लक्ष द्या
👉 अफवांवर विश्वास ठेवू नका, गोंधळून जाऊ नका
👉 पूराच्या पाण्यामध्ये चालणे व गाडी चालवणे टाळा
👉 शरीरावर जखम असल्यास पुराच्या पाण्याचा संपर्क येऊ देऊ नका.यामुळे लेप्टोस्पायरोसिस होण्याची शक्यता असते
👉 तुटलेल्या विद्युत वाहिन्या नजीकच्या पाण्यापासून दूर रहा
👉 पूर परिस्थितीत गरज पडल्यास सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित व्हा
👉 घरात पाणी शिरल्यास विद्युत उपकरणे ताबडतोब बंद करा
👉 पूराच्या पाण्यात चालणे टाळू शकत नसाल तर काठीचा किंवा आधाराचा वापर करा
👉 महत्त्वाची कागदपत्रे, मौल्यवान वस्तू सुरक्षित ठिकाणी ठेवा अतिवृष्टीकाळात मोबाईल फोन जवळ ठेवा
👉 आपत्कालीन परिस्थितीत मोबाईल मेसेजचा वापरा करा
👉 पशू-प्राण्यांना बांधू नका.त्यांचा जीव वाचविण्यासाठी त्यांना कोंडू नका!
👉 आठवडाभर पुरेल, टिकेल असे अन्न, पाणी व औषधे साठवून ठेवा
👉 सखल भागात असाल तर उंच सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित व्हा
👉 आपत्ती कालावधीत स्थानिक प्रशासनाला सहकार्य करा, सुरक्षित रहा
👉 पावसाळ्यात आपल्या घराचे अर्थिंग तपासून पहा
👉 पुराच्या वेळी आवश्यक वस्तूंचा व कागदपत्रांचा संच तयार ठेवा.
👉 पुराच्या वेळी नेहमी उकळलेले पाणी प्या.
👉 पुराच्या काळात बिघडलेली विद्युत उपकरणे वापरणे टाळा.
👉 आणीबाणीत आवश्यक ओळखपत्रे जवळ बाळगा,शासनाची मदत मिळवा.
👉 आपत्तीसाठी मदत क्रमांक: १०७०/१०७७/११२
SACHET मोबाईल ॲप
आपत्ती संबधित इशारा व आपत्तीविषयी माहितीसाठी आजच डाउनलोड करा.
MAUSAM मोबाईल ॲप
या ॲपमध्ये हवामानविषयक पूर्वसूचना व माहिती मिळते जसे कि पाऊस, वीज कोसळणे, चक्रीवादळ इ. Mausam ॲप खाली दिलेल्या QR स्कॅन करून डाउनलोड करा.