सांगली । शिरगाव (ता. वाळवा) येथील श्रीमती वत्सला पांडुरंग पाटील (वय 87) यांचे शुक्रवारी रात्री वृद्धापकाळाने निधन झाले.डॉ. बाबुराव गुरव यांच्या त्या भगिनी आणि इस्लामपूर येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयातील प्रा. डॉ. बी. पी. पाटील यांच्या त्या मातोश्री होत.त्यांच्या पश्चात एक मुलगा,तीन मुली आणि नातवंडे असा परिवार आहे.रक्षा विसर्जन रविवार ता. 26 रोजी सकाळी 9 वाजता शिरगाव येथे आहे.