ठाणे । लोकसभा मतदारसंघासाठी कोणकोणत्या पक्षातील उमेदवारांनी नामनिर्देशनपत्रे सादर केली, तसेच त्यांची सर्व माहिती नागरिकांना मिळावी यासाठी भारत निवडणूक आयोगाने KYC ॲपची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे.
हेही वाचा – उष्माघात : कारणे, लक्षणे, उपचार
Google Play Store वर KYC ॲप डाऊनलोड केल्यास त्यात लोकसभा मतदारसंघ, आपले राज्य व लोकसभा मतदारसंघाचे नाव टाकल्यास त्या मतदारसंघातून नामनिर्देशन दाखल केलेल्या उमेदवारांचे नामनिर्देशन पत्र, प्रतिज्ञापत्र, त्यांचे नावे असलेली संपत्ती तसेच इतर सर्व माहिती नागरिकांना उपलब्ध होणार आहे.तसेच affidavit.eci.gov.in या लिंकवर देखील माहिती उपलब्ध करण्यात आली आहे.